Nupur Sharma Dainik Gomantak
देश

'मला बलात्कार अन् खुनाच्या धमक्या मिळतायेत': Nupur Sharma

BJP: भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

Prophet Remarks Row: भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांनी आपल्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. त्या म्हणाल्या की, 'याआधी माझी मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले होते. माझ्या जीवाला आणखी धोका वाढला आहे. बलात्कार आणि खुनाच्या धमक्या मिळत आहेत.'

विशेष म्हणजे, नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी एका टीव्ही डिबेट शोमध्ये प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यानंतर देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला होता. यानंतर भाजपने त्यांना निलंबित केले. नुपूर शर्मा यांच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कोलकाता पोलिसांनी (Police) त्यांना अनेकदा समन्सही बजावले आहेत. त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे.

याआधीही नुपूर शर्मा यांनी आपल्याविरुद्ध दाखल झालेले सर्व खटले दिल्लीला हस्तांतरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने त्यांच्यावर तीक्ष्ण टिप्पणी केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर देशात उध्दभवलेल्या धार्मिक हिंसाचाराला त्याच जबाबदार असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले होते. नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी, असेही न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी याचिका मागे घेतली.

सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर नुपूर शर्मांनी आता असा युक्तिवाद केला आहे की, 'मला असामाजिक तत्वांकडून पुन्हा बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.' यापूर्वीच्या याचिकेत त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्यांचाही हवाला दिला होता. दिल्लीत पहिली एफआयआर नोंदवण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्या विरोधात दिल्ली (Delhi), महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामध्ये 9 गुन्हे दाखल आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT