Nupur Sharma  Twitter /ANI
देश

Prophet Muhammad Row: नुपूर शर्मांना SC चा दिलासा, सर्व खटले दिल्लीला हस्तांतरित

Nupur Sharma News: भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

Nupur Sharma News: भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरुद्ध विविध राज्यांत दाखल झालेले खटले सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीला वर्ग केले आहेत. यापूर्वी 19 जुलै रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जमशेद पार्डीवाला यांच्या खंडपीठाने प्रेषित मोहम्मद यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी नुपूर यांच्या अटकेला स्थगिती दिली होती. तसेच 8 राज्यांमध्ये नोंदवलेले एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीदरम्यान नुपूर यांचे वकील मनिंदर सिंग यांनी सांगितले की, 'अनेक पक्षांचे उत्तर आलेले नाही. पश्चिम बंगालमधून आम्हाला वारंवार समन्स येत आहेत.' त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, 'आम्ही दंडात्मक कारवाईला स्थगिती दिली आहे.' यानंतर मनिंदर सिंह म्हणाले की, 'सर्व प्रकरणे दिल्लीला (Delhi) वर्ग केल्यास सोयीस्कर होईल.'

यानंतर न्यायमूर्तींनी विचारले की, 19 जुलै रोजी आमच्या सुनावणीनंतर आणखी काही एफआयआर आहेत का? न्यायमूर्ती म्हणाले की, 'आम्ही सर्व एफआयआर एकत्र हस्तांतरित करु आणि दिल्लीला हस्तांतरित करु.' यावर मनिंदर म्हणाले की, एफआयआर रद्द करण्यासाठी दिल्ली हायकोर्टातच (Delhi High Court) याचिकेला परवानगी द्यावी. यावर न्यायमूर्ती म्हणाले की 'हो, होईल.'

काय म्हणाले पश्चिम बंगालचे वकील?

यानंतर पश्चिम बंगालच्या (West Bengal) वकील मनेका गुरुस्वामी यांनी सांगितले की, 'दिल्लीत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये, ज्याचा उल्लेख प्रथम एफआयआर म्हणून केला जात आहे, नुपूर या तक्रारदार आहेत, आरोपी नाही. यावर न्यायमूर्ती म्हणाले की, मग पहिली एफआयआर कोणती आहे, ज्यामध्ये नुपूर आरोपी आहेत? त्यावर मनेका यांनी सांगितले की, 'एफआयआर मुंबईची आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT