T Raja Singh Dainik Gomantak
देश

मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वक्तव्य भोवलं, T Raja Singh यांना भाजपने केले निलंबित

BJP Suspends T Raja Singh: भाजपचे आमदार टी राजा सिंह यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

BJP Suspends T Raja Singh: भाजपचे आमदार टी राजा सिंह यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाजपनेही राजा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 10 दिवसांत उत्तर मागितले आहे. याआधी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राजा यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, भाजप (BJP) आमदाराने सोमवारी स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये तो एका विशिष्ट धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. फारुकी यांनी नुकतेच शहरातील एका कार्यक्रमात परफॉर्म केला आहे.

दुसरीकडे, भाजप नेत्याच्या अटकेची मागणी करत मुस्लिम समाजातील नागरिकांनी सोमवारी रात्री हैदराबादच्या (Hyderabad) अनेक भागात निदर्शने केली होती. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाचे अनेक आमदार आणि ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेचे नगरसेवक पोलीस (Police) ठाण्यात पोहोचले, तिथे त्यांनी निदर्शने केली आणि राजा सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह यांच्याविरोधात अनेक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डबीरपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी कोटेश्वर राव यांनी सांगितले की, 'आम्हाला राजा सिंह यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली असून, भाजप आमदाराने एका विशिष्ट धर्माविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे.'

राव यांच्या म्हणण्यानुसार, सिंह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांतर्गत धर्माच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे, जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये करणे, धर्म आणि धार्मिक श्रद्धांचा अपमान करणे आणि एका विशिष्ट वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकावल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

काय म्हणाले टी राजा सिंह?

गोशामहलचे आमदार सिंह यांनी त्यांच्या अटकेदरम्यान सांगितले की, त्यांनी ज्या सोशल मीडिया साइटवर आपला व्हिडिओ शेअर केला होता, त्या साइटने तो काढून टाकला आहे. सिंग पुढे म्हणाले, "त्यांनी माझा व्हिडिओ यूट्यूबवरुन काढून टाकला आहे. पोलीस काय करणार आहेत, ते मला माहीत नाही. व्हिडिओचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यावर नक्कीच अपलोड करेन. मी हे धर्मासाठी करत आहे. धर्मासाठी मी मरायलाही तयार आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT