Priyanka Gandhi Criticized Central Government Dainik Gomantak
देश

"आम कैसे खाते है" वगैरे प्रश्न त्यांना आवडतात; प्रियंका गांधींचा मोदींवर निशाणा

मागील वर्षाच्या किमतीत किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या किमती जुलैमध्ये 52 टक्क्यांनी वाढल्याचे दिसते आहे.

दैनिक गोमन्तक

कॉंग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनीपुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान महागाईसारख्या सामान्य माणसाच्या प्रश्नावर संसदेत चर्चा करण्यास घाबरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महागाईशी संबंधि काही बातम्या शेअर करत त्यांनी ट्विट केले की, "त्यांना" तुम्ही आंबे कसे खाता वगैरे प्रश्नांची सवय आहे, त्यामुळे वाढत्या महागाईसारख्या सामान्य लोकांना त्रास भेडसावणाऱ्या प्रश्नांवर संसदेत चर्चा करण्यास ते घाबरतात.

मागील वर्षाच्या किमतीत किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या किमती जुलैमध्ये 52 टक्क्यांनी वाढल्याचे दिसते आहे. शुक्रवारी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे म्हणाले की, कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर डाळी आणि खाद्यतेलांसारख्या अत्यावश्यक खाद्यपदार्थांची दरवाढ थांबविण्यासाठी सरकारने अनेक उपाय केले आहेत.

2014 मध्ये केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी भाजप महागाईवर आंदोलन करताना दिसत, मात्र आता सत्तेत आल्यानंतर गप्प असल्याचे पहायला मिळाले आहे. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदींनी महागाईवर अनेक भाषणे दिली. महागाईच्या विरोधात घोषणा असलेले होर्डिंग देखील देशभरात त्याच्या चित्रासह लावण्यात आलेले पहायला मिळायचे. मात्र ते आता सत्तेत आल्यानंतर महागाईच्या प्रश्नावर बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT