Yogi Adityanath and Priyanka Gandhi
Yogi Adityanath and Priyanka Gandhi  Dainik Gomantak
देश

'पडदा' हटवला तर योगींची अनेक गुपितं बाहेर येतील; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

दैनिक गोमन्तक

आगामी विधानसभा निवडणुकांबाबत (Assembly Elections 2022) उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये राजकीय लढाई शिगेला पोहोचली आहे. या राज्यांमध्ये १० फेब्रुवारीपासून मतदान सुरू होणार असून 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. या 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, जी पुन्हा मिळवण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असून तेथे पक्षातील अंतर्गत कलह लपवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाने मोठा खेळ मांडून ठेवल्याने या राज्यांमध्ये आपची राजकीय खेळी दिसून येण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणूक सर्वेक्षणांमध्ये पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळताना दिसत आहे. अशा स्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत रंजक ठरणार असून, त्याची झलक राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या उलथापालथीतून पाहायला मिळत आहे. (Priyanka Gandhi criticize Yogi Adityanath)

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ट्विट करत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी लिहिले की, "उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 5 वर्षांत 16.5 लाख तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. 4 कोटी लोकांनी हताश होऊन नोकऱ्यांची आशा सोडली. मात्र योगी आदित्यनाथ यावर ना काही बोलले ना ट्विट केले. कारण पडदा उचलला तर गुपित उघड होईल हे त्यांना माहीत आहे. तरुणांनो, तुम्ही रोजगाराच्या अजेंड्याला धरून रहा," असे ट्विट करत गांधींनी योगींच्या कामकाजाचा समाचारच घेतला आहे.

प्रियंका गांधी वड्रा यांना 2 टक्के लोकांची पसंती

दरम्यान उत्तर प्रदेशातील (UP Election 2022) 56% लोक मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून योगी आदित्यनाथ यांना पसंती देतात. मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादव हे यूपीच्या 32 टक्के जनतेची पसंती आहेत. बसपा सुप्रीमो आणि उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती या आता केवळ 9 टक्के लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि यूपी निवडणुकीची धुरा सांभाळणाऱ्या प्रियंका गांधी वड्रा यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून केवळ 2 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

85 टक्के लोकांनी मान्य केले - मोदींचाच होणार फायदा

उत्तर प्रदेशातील 85 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा फायदा यूपीच्या योगी सरकारला मिळेल. त्यांनी उत्तर प्रदेशात केलेल्या विकासकामांमुळे उत्तर प्रदेशातील मते भाजप ओढून आणतील. मात्र असे असताना मोदींचा फायदा उत्तर प्रदेशला मिळणार नाही असे 15 टक्के लोकांचे मत आहे. विशेष म्हणजे मोदी हे वाराणसीचे खासदार आहेत. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी उत्तर प्रदेशचा दौरा करून विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT