Private jet Plane Crash At Mumbai Airport Dainik Gomantak
देश

Mumbai Plane Crash: मुंबई विमानतळावर खासगी विमानाला अपघात; लॅंडिंग करताना विमानाचे दोन तुकडे, पहा व्हिडीओ

सुदैवाने अपघातात जिवितहानी झाली नाही

Rajat Sawant

Private jet Plane Crash At Mumbai Airport: लॅन्डिंगच्या वेळी एका खासगी विमानाला खराब हवामानाचा फटका बसल्याने मुंबई विमानतळावर एक दुर्घटना घडली आहे. मुंबई विमानतळावर एक खासगी विमान क्रॅश झाल्याचे माहिती समोर येत आहे. या खासगी विमानातून 8 प्रवासी प्रवास करीत होते.

मुंबई विमानतळावर या अपघातग्रस्त विमानाचे बचावकार्य सुरु आहे. हे विमान विशाखापट्टणम वरुन मुंबईला येत होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

VSR Ventures Learjet 45 हे विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईकडे येत होते. मुंबई विमानतळावर रनवे 27 वर उतरत असताना विमान नियंत्रणाबाहेर गेल्याने विमान क्रॅश झाले. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. यात अपघातात कोणतीही जीवितहानी झाली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

SCROLL FOR NEXT