Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशनची' करणार घोषणा

ज्याचे नामकरण प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन (PM-DHM) असे करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सोमवारी (27 सप्टेंबर, 2021) राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन (NDHM) च्या देशव्यापी रोलआउटची घोषणा करणार आहेत, ज्याचे नामकरण प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन (PM-DHM) असे करण्यात आले आहे. पंतप्रधान डिजिटल स्वास्थ्य मिशन डेटा, माहिती आणि पायाभूत सेवांच्या तरतुदींची कार्यक्षमता वाढवणे, सर्वसमावेशक, परवडणारे आणि सुरक्षित पद्धतीने सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजला समर्थन देण्यात येणार असल्याचे, अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, पीएम-डीएचएम अंतर्गत लोकांना देण्यात आलेल्या डिजिटल हेल्थ आयडीमध्ये नागरिकांच्या सर्व आरोग्य नोंदी असतील. हा आयडी आधार आणि मोबाईल नंबर सारख्या तपशीलांसह व्युत्पन्न केला जाईल आणि प्रत्येक व्यक्तीसाठी हे वेगळे असणार आहेत.

अधिकाऱ्यांनी पुढे असेही सांगितले की, पीएम-डीएचएम सध्या अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव, लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रायोगिक टप्प्यावर सुरु करण्यात आले आहेत.

"या मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट भारतातील आरोग्य व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवणे आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य इकोसिस्टम सामान्य माणसाच्या आरोग्यसेवेच्या गरजांसाठी एक नॉन स्टॉप उपाय असणार आहे. त्यामुळे यापुढे या डिजिटल समर्थित इकोसिस्टमवरील ओझे कमी होणार असल्याचे देखील एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

"याव्यतिरिक्त, हा उपक्रम रुग्णांना उच्च दर्जाच्या सेवांच्या वितरणात क्रांती घडवून आणेल जेणेकरुन हेल्थकेअर प्रदाते अधिक सक्षम होतील. तसेच सुलभ आणि जबाबदारही होतील असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन' (PM-DHM) ची राष्ट्रीय अंमलबजावणी 27 सप्टेंबर रोजी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT