PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'जन औषधी योजने'च्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता जनऔषधी केंद्र मालक आणि योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

दैनिक गोमन्तक

“जन औषधी दिवस” (Jan Aushadhi Diwas) निमित्त, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 7 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता जनऔषधी केंद्र मालक आणि योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधानांच्या अभिभाषणानंतर संवाद साधला जाणार आहे. कार्यक्रमाची थीम "जन औषधी-जन उपयोगी" अशी असणार आहे.

जेनेरिक औषधांचा वापर आणि जन औषधी योजनेचे फायदे याविषयी जनजागृती करण्यासाठी 1 मार्चपासून देशभरात जनऔषधी सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहात जनऔषधी संकल्प यात्रा, मातृशक्ती सन्मान, जनऔषधी बाल मित्र, जनऔषधी जन जागरण अभियान, आओ जन औषधी मित्र बने आणि जनऔषधी जन आरोग्य मेळा अशा विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

औषधे (Medicine) परवडणारी आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, आता देशभरात 8600 पेक्षा जास्त जनऔषधी स्टोअर्स आहेत, ज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT