Prime Minister Narendra Modi will give a presentation to the Opposition Dainik Gomantak
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार विरोधी पक्षांना प्रेझेंटेशन

ही बैठक संसद परिसरातच असणाऱ्या एनेक्सी संसद या इमारतीत होणार आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना महामारी(Covid19 ) या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आज लोकसभा(Loksabha) आणि राज्यसभेतील(Rajyasabha) सर्व पक्षांच्या नेत्यांसमवेत एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील लसीकरणाची(Vaccination) सद्यस्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका या विषयावर सर्व नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच या बैठकीत पंतप्रधान याबाबतीत एक प्रेजेंटेशनही देणार आहेत.ही बैठक संसद परिसरातच असणाऱ्या एनेक्सी संसद या इमारतीत होणार आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या(Monsoon Session) एक दिवस आधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेच्या अ‍ॅनेक्सीमध्ये कोरोना साथीच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.

पण यावरच आता विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. संसद अधिवेशन असताना बाहेर भाषण करण्याची काय गरज आहे असा सवाल विरोधी पक्षांनी सरकारला विचारला आहे. हे नियमात बसणार नसून अनेक समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीकाही विरोधी पक्षांनी केली आहे.

यावेळी सरकारवर टीका करताना तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभेचे सदस्य डेरेक ओ ब्रायन म्हणाले की, 'संसदेच्या बाहेर जाण्याची काय गरज आहे.कुठल्याही विषयाचे संबोधन सभागृहात होऊ शकते . संसदेकडे दुर्लक्ष करण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. संसदेची थट्टा करणे थांबवा. ते पुढे म्हणाले, 'कोणत्याही संमेलन कक्षात पंतप्रधान किंवा या सरकारकडून साथीचा रोग सर्व देशभर किंवा खंडभर असलेला विषयावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पाहायला नको आहे.' 'जे काही सांगायचे असेल ते सभागृहात बोलू शकतात.

तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार बैठकीस उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खरगे, राम गोपाल यादव, सतीश मिश्रा यांनी सरकारची घोषणा नाकारली, असा दावा ओ'ब्रायन यांनी केला. मात्र माहितीनुसार विरोधी पक्षातील नेत्यांपैकी केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा पूर्णपणे नाकारली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT