Narendra Modi said that today's CII meeting is very important in this age of global epidemics. Dainik Gomantak
देश

आधीच्या सरकारमध्ये राजकीय जोखीम घेण्याची हिंमत नव्हती: नरेंद्र मोदी

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जागतिक महामारीच्या या युगात आजची बैठक अत्यंत महत्वाची आहे.

दैनिक गोमन्तक

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जागतिक महामारीच्या या युगात आजची बैठक अत्यंत महत्वाची आहे. मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटरपासून लसीकरणापर्यंत, देशाला जे काही आवश्यक असेल, जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा उद्योगांनी पुढे पाऊल टाकले आणि प्रत्येकवेळी शक्य ते योगदान दिले. सीआयआयची ही बैठक यावेळी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दरम्यान होत आहे. (Prime Minister Narendra Modi said that today's CII meeting is very important in this age of global epidemics.)

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले की, भारतीय उद्योगाच्या नवीन संकल्पांसाठी, नवीन उद्दिष्टांसाठी ही एक मोठी संधी आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या यशाची मोठी जबाबदारी भारतीय उद्योगांवर आहे. आम्ही आयटी क्षेत्रात रेकॉर्ड भर्तीशी संबंधित अहवाल देखील पाहिले आहेत. देशातील डिजिटलायझेशन आणि मागणीच्या वाढीचा हा परिणाम आहे.अशा परिस्थितीत आपण या संधींचा वापर करू, दुप्पट वेगाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू असा आपला प्रयत्न असावा. आजचा भारत नवा भारत तयार आहे, नव्या जगासोबत जाण्यासाठी तयार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे असेही म्हणाले की, एक काळ होता जेव्हा आम्हाला असे वाटत होते की, जे काही चांगले आहे ते परदेशात आहे. या सायकॉलॉजीचा परिणाम काय होतो, तुमच्यासारख्या उद्योगातील दिग्गजांना खूप चांगले समजते. आपले स्वतःचे ब्रॅण्ड्स, जे आपण अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर बनवले होते, त्यांना परदेशी नावाने प्रोत्साहन देण्यात आले. मात्र आज परिस्थिती वेगाने बदलत आहे. आज देशवासीयांची भावना भारतात बनवलेल्या उत्पादनांच्य़ा सोबत आहेत. कंपनी भारतीय असलीच पाहिजे असे नाही, पण आज प्रत्येक भारतीयाला भारतात बनवलेली उत्पादने घ्यायची आहेत.

आपल्या भाषणात पुढे पंतप्रधान म्हणाले की, आज देशात एक असे सरकार आहे जे देशाच्या हितासाठी कोणताही मोठा धोका पत्करण्यास तयार आहे. जीएसटीचा मुद्दा इतके वर्ष अडकून पडला होता, कारण जे लोक आधी सरकारमध्ये होते ते राजकीय जोखीम घेण्याची हिंमत दाखवु शकले नाहीत. आम्ही केवळ जीएसटी लागू केला नाही तर आज आपण विक्रमी जीएसटी संकलनाचे साक्षीदार आहोत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रसेवर टीकास्त्र सोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT