Andaman & Nicobar Dainik Gomantak
देश

Andaman & Nicobar: अंदमान-निकोबाराच्या विविध बेटांना मोदींनी दिली 'ही' नावे, तुम्हालाही वाटेल अभिमान

शौर्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पराक्रम दिनानिमित्त अंदमान आणि निकोबार येथील विविध 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे दिली आहेत.

Pramod Yadav

आज देशभरात शौर्य दिन (Parakram Diwas) साजरा केला जात आहे. 2021 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने याची घोषणा केली होती.

शौर्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पराक्रम दिनानिमित्त अंदमान आणि निकोबार येथील विविध 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे दिली आहेत. यासोबतच पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

(Prime Minister Narendra Modi names the 21 largest unnamed islands of Andaman & Nicobar Islands)

बेटावर बांधल्या जाणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनावरण केले.

अंदमान आणि निकोबार बेटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आणि नेताजींच्या स्मृतीचा आदर करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये त्यांच्या बीटा दौऱ्यात रॉस बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे केले. नील द्विप आणि हॅवलॉक बेटांना शहीद द्विप आणि स्वराजद्वीप अशी नावे देण्यात आली.

बेटांना यांची नावे देण्यात आली आहेत!

मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि मानद कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग, द्वितीय लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग कॅप्टन जीएस सलारिया, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन लान्स नाईक), (मेजर) धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, सीक्यूएमएच अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर,

लान्स नाईक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर (तत्कालीन रायफलमन आणि सुभेदार कुमार संजाल) (माननीय कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव. अशी या बेटांनी दिलेली नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT