Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
देश

'आता उद्योगधंदे अन् व्यापार बंद होणार नाही': पंतप्रधान मोदी

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. यातच दुसरीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. देशात लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. याच पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठकीनंतर देशाला संबोधित करताना देशात लसीकरणावर जोर देण्याचे सूचक वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले की, ओमिक्रॉन (Omicron Variant) हे एक नवीन आव्हान म्हणून समोर आले आहे. आपण कोरोनाविरुद्धच्या युद्धात नक्कीच जिंकू. ओमिक्रॉनबाबत संशयाची परिस्थिती आता राहिलेली नाही. अमेरिकेत दररोज 14 लाख नवीन प्रकरणे समोर येत आहेत, त्यामुळे आपण सावध राहायला हवे. परंतु यासोबतच घाबरुन जाऊ नका. मात्र काळजी घेतली पाहिजे. सणासुदीच्या काळात राज्य सरकारांची सतर्कता कमी होता कामा नये.

पंतप्रधान पुढे म्हणाले, लसीकरणाबाबत कोणताही संभ्रम निर्माण होऊ देऊ नका. आम्हाला कोरोनाशी लढण्याचा 2 वर्षांचा अनुभव आहे. कोणतीही रणनीती बनवताना आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, हे खूप महत्त्वाचे आहे. स्थानिक सामग्रीवर अधिक लक्ष केंद्रित करणे चांगले होईल. जिथून कोरोनाची अधिक प्रकरणे येत आहेत, तिथे जास्तीत जास्त चाचण्या झाल्याचीही खात्री करणे आवश्यक आहे. यासोबतच होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार केले जाऊ शकतात, हे देखील आवश्यक आहे. होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT