Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनपुसार, नॅशनल इंव्हेस्टिगेशन एजन्सीला यासंदर्भात काही ई-मेल मिळाले आहे. एवढंच नाही तर रचलेल्या कटाचा पर्दाफास होऊ नये यासाठी आपण आत्महत्या करत असल्याचा दावाही या मेलमधून करण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधानांची (Prime Minister Narendra Modi) हत्या करण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स आहेत. गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने, स्लीपर सेलकडून 20 किलो आरडीएक्सच्या साहाय्याने पंतप्रधानांना मारण्याचा कट रचला जात होता. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटासंदर्भात ई-मेलचा स्त्रोत काय? याची माहिती संरक्षण संस्था मिळवत आहेत.

शिवाय, ईमेलनुसार, पंतप्रधानांच्या हल्ल्याची योजना तयार करण्यात आली आहे. ज्या अज्ञात व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने हा धमकीचा मेल इतर गुप्तचर संस्थांना पाठवला आहे. त्याचबरोबर ज्या ईमेल आयडीवरुन हा मेल आला, त्याची बारकाईने तपास यंत्रणांकडून तपासणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT