Prime Minister Narendra Modi emotional on Partition Dainik Gomantak
देश

'फाळणीचे दुःख कधीच विसरू शकणार नाही': पंतप्रधान

पीएम मोदींनी 14 ऑगस्टला 'विभाजन विभीषिका मेमोरियल डे' (PartitionHorrorsRemembranceDay) साजरा करण्याची घोषणा देखील केली आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) एक दिवस आधी भारत-पाकिस्तान विभाजनाची (India Pakistan Partition) आठवण केली आहे. देशाच्या विभाजनाची वेदना कधीही विसरता येणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. द्वेष आणि हिंसाचारामुळे आमच्या लाखो बहिणी आणि बांधवांना विस्थापित व्हावे लागले आणि त्यांचे प्राणही गमवावे लागले. यासोबतच, पीएम मोदींनी 14 ऑगस्टला 'विभाजन विभीषिका मेमोरियल डे' (PartitionHorrorsRemembranceDay) साजरा करण्याची घोषणा देखील केली आहे.(Prime Minister Narendra Modi emotional on Partition)

पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले, "फाळणीत विस्थापित झालेल्या आणि प्राण गमावलेल्या आमच्या लाखो बहिणी आणि बांधवांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट 'विभीषण मेमोरियल डे' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

पंतप्रधान मोदी म्हणाले, #PartitionHorrorsRemembranceDay चा हा दिवस आम्हाला केवळ भेदभाव, वैमनस्य आणि वाईट इच्छा यांचे विष काढून टाकण्यासाठी प्रेरणा देणार नाही, तर तो ऐक्य, सामाजिक सौहार्द आणि मानवी संवेदनांना बळकट करणारा असेल.

मोदींनी व्यक्त केली हळहळ -

15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण ब्रिटिश सत्तेने फाळणीची मोठी किंमत देऊन भारताला स्वातंत्र्याचा आनंद सोपवला होता. 14 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तानचे दोन भाग झाले.अगदी 15 ऑगस्टच्या सकाळीसुद्धा हे लोक त्यांच्या जन्मभूमीतून ट्रेन, घोडे, खेचर तसेच पायी इतर देशांकडे जात होते.पाकिस्तानातून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात येणाऱ्यांच्या चेहऱ्यावरून जणू सर्व रंगच गायब होते. असे म्हटले जाते की फाळणीच्या वेळी दोन्ही बाजूंनी दंगली उसळल्या आणि लाखो लोकांना हिंसाचारात आपले प्राण गमवावे लागले. काही अहवालांमध्ये, ही संख्या 10 लाखांपासून 20 लाखांपर्यंत देखील सांगितली गेली आहे. या शोकांतिकेने कोणालाही सोडले नाही. महिला, मुले, वृद्ध सर्वजण या हिंसाचाराला बळी पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT