Prime Minister Modi & Chief Minister of Uttar Pradesh Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

पंतप्रधान मोदी अन् CM योगींना बॉम्बने उडविण्याची धमकी; ट्विटरवरुन आला संदेश

हा धमकीचा संदेश आल्यानंतर तात्काळ क्राईम ब्रांचकडे (Crime Branch) तपास सोपविण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ (Chief Minister of Uttar Pradesh Yogi Adityanath) यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्याची धमकी, 112 कंट्रोल रुमच्या सोशल मिडियावरील ट्वीटर हॅंडलवरुन देण्यात आली आहे. हा धमकीचा संदेश आल्यानंतर तात्काळ क्राईम ब्रांचकडे तपास सोपविण्यात आला आहे. दिवाळीच्या दिवशीच अशाप्रकारची धमकी आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 112 कंट्रोल रुमच्या दीपक शर्मा (Deepak Sharma) नामक व्यक्तीच्या ट्वीटर आकाऊंटवरुन हा संदेश पाठविण्यात आला असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. या संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यात येणार असल्यासंदर्भात लिहिण्यात आले आहे. एवढचं नाही तर या ट्वीटच्या माध्यमातून इतरही काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याबाबतीत करण्यात आला आहे.

दरम्यान, जेसीपी क्राइमच्या नीलाब्जा चैधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीच्या ट्वीट पाठविणाऱ्या ट्वीटर हॅंडलसंदर्भात माहीती जमा करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास तात्काळ क्राइम ब्रांचकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी देखील पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अनेकवेळा धमकीचे कॉल, सोशल मिडियावरुन अनेक वेळा धमक्या आणि आक्षेपार्ह संदेशही पाठविण्यात आल आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT