Yashwant Sinha Dainik Gomantak
देश

राष्ट्रपती निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांचा मोठा इशारा

विरोधी पक्ष जुलैच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांचे संयुक्त उमेदवार म्हणून नाव देऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या नावाचा गोंधळ सुरू झाला आहे, त्यांनी ट्विटमध्ये सूचित केले आहे की विरोधी पक्ष जुलैच्या निवडणुकीसाठी त्यांचे संयुक्त उमेदवार म्हणून नाव देऊ शकतात. सिन्हा यांनी आपला राजीनामा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याकडे पाठवला अशी माहिती मिळत आहे. (Presidential Election 2022)

18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा आज सकाळ त्यांनी केलेल्या ट्विट वरून सुरु झाली ट्विट मध्ये असे लिहीले आहे की, विरोधी पक्षांच्या एकजुटीसोबत काम करण्यासाठी मला पक्षापासून दूर जावे लागेल. मला खात्री आहे की ममता बॅनर्जी यांना माझा हा निर्णय मान्य असेल. त्या ट्विटमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांचे आभार देखील मानले आहेत.

यापूर्वी यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता. आपला राजीनामा पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठवला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर यशवंत सिन्हा सध्या बोलू इच्छित नसल्याचे चित्र आहे.

यापूर्वी तीन संभाव्य उमेदवारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. तर ज्या तीन नावांवर चर्चा झाली आणि ऑफर नाकारण्यात आली त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला आणि महात्मा गांधींचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT