Pratik Gandhi
Pratik Gandhi Dainik Gomantak
देश

प्रतिक गांधी दिसणार महात्मा गांधीजींच्या भूमिकेत

दैनिक गोमन्तक

सत्य, प्रेम अहिंसा आणि दृढ निश्चय, ही महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) शिकवण आहे. महात्मा गांधी एका महान नेते होते, शांततेचे प्रतीक होते आणि मानवतेसाठी एक चमत्कार देखील होते. त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने भारतीय इतिहासाचा मार्ग बदलला आहे. (Prateek Gandhi will be seen in the role of Mahatma Gandhi)

भारतीय स्वातंत्र्यांच्या कालखंडाला जिवंत करून, आदित्य बिर्ला समूहाच्या अॅप्लाज एंटरटेनमेंट या उपक्रमाने 'गांधी' यांच्या जीवनावर आधारित एक महत्त्वाचा बायोपिक येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही मालिका प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी बिफोर इंडिया' आणि 'गांधी - द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड' या दोन पुस्तकांवर आधारित असणार आहे.

महान महात्मांच्या भूमिकेसाठी अभिनेता प्रतीक गांधीची (Pratik Gandhi) निवड करण्यात आली. अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या जनकाचे अद्भुत जीवन आणि तो काळ पुन्हा तयार करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. महात्मा गांधींच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आणि दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या कृतींपासून ते भारतातील त्यांच्या महान संघर्षापर्यंत, मालिकेत त्यांच्या जीवनातील काही कथा देखील सांगितल्या जातील ज्यांनी त्यांना तरुण गांधींपासून महात्मा गांधी बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

यात महात्मा गांधींच्या सर्व स्वातंत्र्य चळवळीतील समकालीन लोक, त्यांच्यासोबत मुक्त आणि आधुनिक भारत घडवण्यात अविभाज्य भूमिका बजावणाऱ्या अतुलनीय व्यक्तिमत्त्वांच्या कथा देखील त्यामध्ये असणार आहेत. या मालिकेवर भाष्य करताना, अॅप्लॉज एंटरटेनमेंटचे सीईओ समीर नायर म्हणाले की, “रामचंद्र गुहा एक इतिहासकार आणि उत्कृष्ट कथा लेखक आहेत आणि आपल्याला त्यांची उत्कृष्ट पुस्तके, 'गांधी बिफोर इंडिया' आणि 'गांधी द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड' पाहण्याची सर्वांना गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT