Sushma Swaraj Dainik Gomantak
देश

सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात पद्म पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या हस्ते 119 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रपती भवनात आज आयोजित केलेल्या समारंभात पद्म पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या हस्ते 119 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या यादीत 7 पद्मविभूषण, 10 पद्मविभूषण आणि 102 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस (George Fernandes) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि अरुण जेटली यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हेही या सोहळ्याला उपस्थित होते.

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या वतीने त्यांची कन्या बन्सुरी स्वराज आणि अरुण जेटली यांच्या वतीने त्यांच्या पत्नी संगीता जेटली यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1954 साली स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात येते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 2014 पासून अनेक 'अज्ञात नायकांचा' सन्मान करत आहे, ज्यांनी समाजासाठी विविध प्रकारे योगदान दिले आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील लोकांच्या 'उत्कृष्ट कार्य किंवा योगदानासाठी त्यांचे कौतुक केले जाते. हे पुरस्कार विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी, सर्व क्षेत्रातील सेवा, कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक कार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी विषयांसाठी दिले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT