Patna Viral Video Dainik Gomantak
देश

Patna Viral Video: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या... आणि रेल्वेच्या टीव्ही स्क्रीनवर अचानक सुरू झाली पॉर्न क्लिप

प्लॅटफॉर्मवर महिला आणि काही लोक आपल्या मुलांना घेऊन ट्रेनची वाट पाहत उभे होते, मात्र अचानक ही घटना घडली. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Patna Station Viral Video: बिहारची राजधानी पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या टीव्ही स्क्रीनवर अचानक अश्लील फिल्म सुरू झाली. यामुळे अनेक प्रवाशांना मान खाली घालावी लागली. प्लॅटफॉर्मवर महिला आणि काही लोक आपल्या मुलांना घेऊन ट्रेनची वाट पाहत उभे होते, मात्र अचानक ही घटना घडली. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले.

रविवारी सकाळी ही घटना घडली. याबाबत तक्रार केल्यानंतर, आरपीएफने तात्काळ फोन करून संबंधित एजन्सीला ती किल्प बंद करण्यास सांगितले.

दरम्यान, पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर 19 मार्च रोजी घडलेली घटना अत्यंत गंभीरपणे घेत, दत्ता स्टुडिओ कंपनी प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध दोन एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. एक एफआयआर आरपीएफने तर दुसरा जीआरपीने आयटी कायद्यांतर्गत दाखल केली आहे.

एजन्सीचा करार रद्द करून तिला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे. त्याच्याद्वारे चालवलेल्या सर्व टीव्ही स्क्रीन डिस्कनेक्ट केल्या आहेत आणि लॉग आउट देखील केले गेले आहेत. या घटनेची आरपीएफ आणि जीआरपीकडून चौकशी केली जात आहे. असेही या निवेदनात म्हटले आहे.

बिहारची राजधानी पाटणा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर एका दिवसानंतर, रेल्वेने सोमवारी सांगितले की स्क्रीनवर जाहिरात प्रसारित करणाऱ्या एजन्सीचा करार रद्द केला आहे.

रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) यांनी एजन्सीविरुद्ध प्रत्येकी एक एफआयआर नोंदवला आहे. . जीआरपी आणि आरपीएफ या प्रकरणाचा तपास करत आहेत. असे पूर्व मध्य रेल्वेचे (ईसीआर) मुख्य जनसंपर्क अधिकारी वीरेंद्र कुमार यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT