PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-21 जून रोजी 2 दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जूनपासून कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 20 जूनपासून कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत आणि बंगळुरूमध्ये एका सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी 20 जून रोजी सकाळी 11:55 वाजता बेंगळुरू येथील येलाहंका हवाई तळावर पोहोचतील. तसेच पंतप्रधान युक्रेनमध्ये ठार झालेल्या वैद्यकीय विद्यार्थी नवीनच्या कुटुंबाला भेटतील. (PM Narendra Modi will pay a two day visit to Karnataka on June 20 21)

पंतप्रधान ज्या भागाला भेट देणार आहेत त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पीएम मोसी यांच्या दौऱ्यापूर्वी अनेक रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण देखील करण्यात आले आहे. मोदी ज्या ठिकाणी भेट देणार आहेत तेच रस्ते विकसित करण्यात आल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा म्हणाले की, मी मोदींना म्हैसूरला आणत असल्याने लोकांनी माझे आभार मानायला हवे.

"मी पंतप्रधान मोदींना म्हैसूरला आणत असल्याने लोकांनी प्रथम माझे आभार मानले पाहिजेत, किमान पीएम मोदींच्या नावाने रस्ते विकसित करण्यात येत आहेत. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरातील रस्तांकडे दुर्लक्ष होत आहे. पंतप्रधानांनी यासाठी निधी देखील मंजूर केला आहे. धावपट्टीचे विस्तारीकरण, चामुंडेश्वरी मंदिरासाठी 50 कोटी रुपये, रस्ते विकासासाठी निधी मंजूर करून तो शहराला जोडला जात आहे. येत्या सहा महिन्यात म्हैसूरमधील सर्व रस्त्यांचा विकास होईल, असे लोकसभा खासदार म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT