PM Modi Dainik Gomantak
देश

PM मोदींच्या दु:खात सामील झाला दुसरीत शिकणारा चिमुरडा; विद्यार्थ्याच्या शोक पत्राला मोदींचे उत्तर

इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लिहलेले पत्र आणि त्याला पंतप्रधान मोदींनी दिलेले उत्तर एका भाजप आमदाराने शेअर केले आहे.

Pramod Yadav

बेंगळुरूमधील दुसरीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या शोक संदेश पत्राला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे. या लहानग्या मुलाच्या पत्राला मोदींनी दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लिहलेले पत्र आणि त्याला पंतप्रधान मोदींनी दिलेले उत्तर एका भाजप आमदाराने शेअर केले आहे.

भाजप नेते आणि आमदार खुशबू सुंदर यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. "हीच खऱ्या राज्यकर्त्याची गुणवत्ता आहे! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या शोक पत्राला प्रतिसाद दिला. हा जीवन बदलणारा प्रतिसाद असून, तरुणाच्या आयुष्याला योग्य दिशा देतील."

विद्यार्थ्यांने पत्रात काय म्हटले आहे?

"प्रिय पंतप्रधान नमस्कार, तुमच्या आईचे निधन झाल्याची बातमी टीव्हीवर पाहून मला दु:ख झाले. तुमच्या आई हिराबेन ज्यांचे वय 100 वर्षे होते त्यांचे आज निधन झाले.

प्रिय पंतप्रधान कृपया माझी श्रद्धांजली स्विकार करा.त्यांच्या मृतआत्म्यास शांती मिळावी अशी प्रार्थना मी करतो. ओम शांती." असे मुलाने आपल्या पत्रात म्हटले आहे.

आरूष श्रिवास्ता असे या मुलाचे नाव आहे.

पंतप्रधानानी काय उत्तर दिले?

आरूष श्रिवास्ता तू माझ्या आईसाठी दिलेली श्रद्धांजली मी स्विकार करतो. आईचे निधन हा कधीही न भरून येणारे नुकसान आहे, हे दु:ख शब्दांच्या पलिकडचे आहे. तू याबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली याबाबत मी तुझे आभार मानतो. अशा गोष्टीच मला दु:ख सहन करण्याची शक्ती आणि धैर्य देतात. असे पंतप्रधानांनी उत्तर दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT