PM Modi| Heeraben Modis Dainik Gomantak
देश

PM Modi यांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली, राहुल गांधी म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात (UN Mehata Hospital, Ahmedabad) दाखल करण्यात आले आहे. हीराबा यांना नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल आहे अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, हिराबा यांनी 18 जून रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना 11 मार्च रोजी रात्री 9 वाजता आई हीराबा यांना भेटण्यासाठी ते गांधीनगरला पोहोचले होते, जिथे त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते. तेव्हा पीएम मोदींनी त्यांच्यासोबत खिचडी खाल्ली होती.

तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी त्यांच्या आईची भेट घेतली. त्यावेळी पीएम मोदी त्यांच्या आईशेजारी बसलेले दिसले. तसेच पंतप्रधान मोदींनीही तिच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मीडिया‌ रिपोर्टनुसार हीराबा यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान दुपारी अहमदाबाद येथे येण्याची शक्यता आहे.

पण याबाबत अद्यात अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे, असरवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार दर्शनाबेन वाघेला या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे कॅबिनेटच्या बैठकीत आहे. बैठक समाप्त होताच ते देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT