Narendra Modi Dainik Gomantak
देश

Mann Ki Baat: ‘पोषण मास’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी PM मोंदींचे नागरिकांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसोबत 'मन की बात' मधून संवाद साधला. या कार्यक्रमाचा हा 92वा भाग आहे.

दैनिक गोमन्तक

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसोबत 'मन की बात' मधून संवाद साधला. या कार्यक्रमाचा हा 92वा भाग आहे. या आधी स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना संवाद साधला होता. आज कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम मोदी अनेक मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. या रेडिओ कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींनी नुकतेच देशवासीयांचे मत विचारले होते.

PM मोदींनी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 13-15 ऑगस्ट दरम्यान आयोजित केलेल्या हर घर तिरंगा मोहिमेचे स्मरण केले. मोहीम प्रचंड यशस्वी केल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले. अमृत ​​महोत्सवाचा उत्सव केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाला, असे पंतप्रधान मोदींनी म्हणाले.

यावेळी पीएम मोदी म्हणाले की, "काही दिवसांपूर्वीच मला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी 'स्वराज दूरदर्शन' या मालिकेचे स्क्रीनिंग केले. देशाच्या तरुण पिढीला स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या नायक-नायिकांच्या प्रयत्नांची ओळख करून देण्याचा हा एक उत्तम उपक्रम आहे. हा कार्यक्रम दूरदर्शनवर दर रविवारी रात्री 9 वाजता प्रसारित केले जाते, जे 75 आठवडे चालणार आहे. वेळ काढून पाहा आणि तुमच्या घरातील मुलांनाही दाखवा, जेणेकरुन स्वातंत्र्याच्या या महान वीरांबद्दल आपल्याला एक नवी जाणीव निर्माण होईल."

या कार्यक्रमात 'पोषण मास' उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केले. कुपोषणाविरुद्धच्या वार्षिक 'पोषण मास'मध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. दरवर्षी सप्टेंबरमध्ये उपक्रम राबविला जातो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT