PM Kisan Scheme Dainik Gomantak
देश

PM Kisan Scheme: लाभार्थ्यी शेतकऱ्यांना मिळणार दुहेरी फायदा

शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील म्हणजेच 4000 रुपये ट्रान्सफर होतील.

दैनिक गोमन्तक

Pm Kisan Status:पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये खाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर लवकरच तुमच्या खात्यात पूर्ण 4000 रुपये येणार आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा संपूर्ण लाभ मिळतो, मात्र डिसेंबरमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 ऐवजी 4000 रुपये जमा होणार आहेत. ज्या शेतकर्‍यांना अजून 9व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर होतील. मात्र ही सुविधा फक्त त्याच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे.

PM Kisan Scheme

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबर 2021 पर्यंत तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी पैसे मिळतील. यावेळी नाताळपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

PM Kisan Scheme

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. याशिवाय 2 हेक्टर लागवडीयोग्य जमीन असणे देखील आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

PM Kisan Scheme

शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. यामध्ये सरकार 2000-2000 रुपये 3 हप्त्यांमध्ये देते. आतापर्यंत सरकारने 109678178 कोटींची रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे.

PM Kisan Scheme

तुम्हाला तुमच्या या योजनेच्या हप्त्याची स्थिती तपासायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, येथे तुम्हाला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय मिळेल. तुम्ही लाभार्थी स्थितीच्या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासाठी एक नवीन पेज उघडेल. या नवीन पेजवर, आधार क्रमांक, बँक खाते किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा आणि आपला डेटा वर क्लिक करा. येथे तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT