pm kisan latest news under man dhan yojna farmers will get rs 36000 yearly pm kisan Dainik Gomantak
देश

आता शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार 'एवढी' रक्कम, असा घ्या लाभ

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

दैनिक गोमन्तक

पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये मिळू शकतात आणि त्यासाठी त्यांना कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 2000 चे तीन हप्ते म्हणजेच 6000 रुपये वार्षिक मिळतात. पण आता या योजनेत तुम्हाला वार्षिक 36000 रुपये मिळू शकतात.

आता तुम्हाला 36000 रुपये मिळू शकतात

पीएम किसान (pm kisan) मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन दिली जाते. या योजनेंतर्गत, वयाच्या 60 वर्षांनंतर, शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन म्हणजेच 36000 रुपये प्रति वर्ष दिले जातात. मोदी सरकार ही रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी देते.

आवश्यक कागदपत्रे

केंद्र सरकारच्या (Central Government) या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. जसे आधार कार्ड, बँक (bank) खाते तपशील इ. पण जर तुम्ही पीएम किसानचा फायदा घेत असाल तर तुम्हाला यासाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये वयानुसार गुंतवणुकीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

1. या योजनेचा लाभ 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो.

2. यासाठी लागवडीयोग्य जमीन जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत असावी.

3. यामध्ये किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे वयाच्या शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये मासिक, शेतकऱ्यांच्या (farmer) वयानुसार गुंतवावे लागतील.

4. वयाच्या 18 व्या वर्षी सामील होणार्‍या शेतकर्‍यांना 55 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल.

5. जर शेतकऱ्याचे वय 30 वर्षे असेल तर त्याला 110 रुपये जमा करावे लागतील.

6. जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सामील झालात तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT