PFI
PFI Dainik Gomantak
देश

PFI बाबत मोठा खुलासा, आखाती देशांतून दिला जातोय कोट्यवधींचा निधी

दैनिक गोमन्तक

PFI sources Of Funding: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशभरात टाकलेल्या छाप्यांमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. सुरक्षा एजन्सींच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात पीएफआयला देश आणि विदेशातून निधी मिळण्याबाबत महत्त्वाचे क्लूस मिळाले आहेत. आखाती देशांमध्ये पीएफआयबद्दल सहानुभूती असलेले मुस्लिम लोक पीएफआयला कोट्यवधी रुपयांचा निधी देत ​​आहेत.

पीएफआयला दरमहा सुमारे कोटी रुपयांचा निधी दिला जातोय

तपास यंत्रणांच्या अहवालानुसार, प्रत्येक महिन्याला 3 मिलियन दिरहम म्हणजे सुमारे 67 कोटी रुपये एकट्या UAE आणि अरब देशांमधून PFI ला दिले जातात. एनआयए आणि ईडीच्या तपासात आखाती देशांना पीएफआयशी जोडलेल्या अनेक मेन पावर सप्लाई कंपन्यांची माहिती मिळाली आहे.

या रुटद्वारे पैसा येतो

केरळ, तामिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमधून या कंपन्यांद्वारे आखाती देशांमध्ये कामासाठी गेलेले हजारो लोक दर महिन्याला पीएफआयला निधी देतात. कधीकधी पीएफआयला हवालाद्वारेही निधी मिळतो.

सुरक्षा एजन्सीशी संबंधित एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 30,000 हून अधिक पीएफआय कॅडर किंवा मुस्लिम पीएफआयचे सहानुभूतीदार यूएई (UAE) आणि अरब देशांमध्ये या मेन पावर सप्लाईद्वारे वित्तपुरवठा करतात. या सर्वांमधून 100 दिरहम दरमहा PFI ला निधी द्यावा लागतो. म्हणजेच ते मिळून दर महिन्याला PFI ला 3 दशलक्ष दिरहम निधी देतात.

पीएफआयच्या कमाईचे सत्य समोर आले

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएफआय पुस्तक प्रकाशन, मासिके आणि सीडीच्या माध्यमातून देखील कमाई करते. यासोबतच देशातील अनेक मशिदी आणि मदरशांमधूनही पीएफआयला निधी दिला जातो. केरळमधील (Kerala) काही स्वयंसेवी संस्थांचीही नावे तपासात समोर आली आहेत, ज्यांच्या माध्यमातून आखाती देशांतील पीएफआयला निधी दिला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT