Luxury Brand Balenciaga Sweater Dainik Gomantak
देश

Luxury Brand Balenciaga विकतेय 1 लाखात फाटलेलं स्वेटर!

कंपनीने फाटलेला स्वेटर इतक्या महाग किंमतीत बाजारात आणला आहे की, बघणाऱ्यांचेही डोळे किंमत बघून फाटतील.

दैनिक गोमन्तक

आजकालचा फॅशन ट्रेंड (Fashion trends) बघितल्यावर असे वाटते की हे खरोखर युनिक आहे की, फॅशनची नवी दुनिया. बऱ्याच वेळा अनेक कंपन्यां फॅशन ट्रेंड च्या नावाने स्वस्त वस्तू इतक्या महाग विकतात की त्याची किंमत ऐकताच सामान्य व्यक्ती हैरान होतो. फॅशनच्या या जगात एक एक लक्झरी ब्रँड आहे Balenciaga. या कंपनीने फाटलेला स्वेटर (Sweater) इतक्या महाग किंमतीत बाजारात आणला आहे की, बघणाऱ्यांचेही डोळे ही किंमत बघून फाटतील. या कपड्यांची किंमत बघून विश्वास बसणार नाही.

बॅलेंसियागाच्या डिझायनर्सनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन स्वेटर बनवले आहे. ज्याची किंमत $ 1,450 आहे. जर या स्वेटरची किंमत भारतीय चलनात बघायला गेलं तर त्याची किंमत 1 लाख रुपये आहे. हे स्वेटर पाहून तुम्हाला असे वाटेल की, हे स्वेटर अनेक वर्षांपासून एका बॉक्समध्ये पडून होते आणि उंदरांनी ते पुर्ण कुरतडले आहे.

हे स्वेटर आणि त्याची किंमत सोशल मीडियावर लोकांसमोर येताच युजर्सनी या स्वेटरची खिल्ली उडवायला सुरुवात केली. एका वापरकर्त्यावर त्यावर कमेंटही केली. "हे स्वेटर घातल्यानंतर तुम्हाला भिकाऱ्यांच्या टोळीतील पळून गेलेल्या एखाद्या चोरट्यासारखे वाटेल." अशी कमेंट एका युजर्सने केली आहे. दुसर्‍या युजर्सने लिहिले की, हे ओव्हरसाईज स्वेटर घातल्यानंतर तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या दंगलितून आले आणि एखाद्या प्राण्याने तुमचे कपडे फाडले असतील.

मीडिया रिपोर्टनुसार, हे स्वेटर डिस्ट्रेस्ड आणि उच्च दर्जाच्या लोकरने बनवले आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने दावा केला आहे की, " हे स्वेटर 100% व्हर्जिन लोकर पासून बनवले गेले आहे. जे इटलीहून तयार करून आणले आहे. तेव्हा हे स्वेटर पाहिल्यानंतर तुम्हाला कसे आणि काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT