patna city rohtas resident girl trapped in human trafficking while she was going to school recovered from begusarai  Dainik Gomantak
देश

'...रेडलाइट एरियात पोहोचली, मुलीने सांगितली आपबिती

छतावरून उडी मारून काढला पळ

दैनिक गोमन्तक

रोहतास जिल्ह्यातील एक अल्पवयीन शनिवारी सकाळी बखरी येथील नदेल घाट रेडलाइट येथुन पळून गेली. दरम्यान मुलीने मदत मागितल्यानंतर गावकऱ्यांनी तिला आपल्या संरक्षणात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीने सांगितले की, ती दोन महिने रेडलाइट एरियात होती. या घटनेच्या दिवशी ती शाळेतून घरी जात होती. वाटेत तिला तहान लागली. त्याच मार्गावर अगोदरच चारचाकी गाड्या लावलेल्या काही लोकांनी तिला पिण्यासाठी पाणी दिले आणि जबरदस्तीने गाडीत बसवले. दरम्यान या मुलीला बिहारच्या सीमांचल भागात नेण्यात आले. त्यानंतर ती बेगुसरायला आली व येथून त्याला मिथिलांचलला पाठवण्याची तयारी सुरू होती.(patna city rohtas resident girl trapped in human trafficking while she was going to school recovered from begusarai)

दोन महिने काम करण्यास भाग पाडले

मुलीने दावा केला की तिने आवाज उठवला, परंतु तिचे ऐकणारे कोणी नव्हते. तिला किशनगंजमध्ये दोन महिने ठेवले होते. तसेच तिला शरीर व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. ती त्याच्यासाठी तयार नव्हती, म्हणून पाच दिवसांपूर्वी दलालांनी तिला बखरीत पाठवले. तिथे तिला खोलीत कोंडून ठेवले होते. म्हणूनच तिला ठिकाण आणि नाव माहित नाही.

बेगुसरायहून सीतामढी पाठवण्याची तयारी झाली. दरम्यान, ती तेथून पळून जाण्याची संधी शोधत राहिली. शनिवारी सकाळी तेथील सर्वजण झोपलेले असताना तिने छतावरून उडी मारून पळ काढला. स्थानिक लोकांनी तिला संरक्षण देत पोलिसांना माहिती देऊन बोलावले. मुलीने सांगितले की तिला घरी जायचे नाही. माझे कुटुंबीय मला स्वीकारणार नाहीत. येथे विचारणा केली असता पोलिस निरीक्षक हिमांशू कुमार सिंह यांनी सांगितले की, मुलीची चौकशी केली जात आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT