Parliament's Monsoon Session Dainik Gomantak
देश

Parliament's Monsoon Session: सुरूवात जुन्या तर नवीन संसदेत शेवट, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा

संसदेचे पावसाळी अधिवेशन घोषणा करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Parliament's Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन घोषणा करण्यात आली असून, 20 जुलैपासून अधिवेशन सुरू होणार असून, 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज याबाबत माहिती दिली आहे.

पावसाळी अधिवेशन संसदेच्या जुन्या इमारतीत सुरू होऊन ते अधिवेशन काळात नवीन संसद भवनात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला माहिती दिली आहे.

नवीन संसदेचे उद्घाटन झाल्यापासून हे पहिलेच अधिवेशन असेल. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधिवेशनाची घोषणा करत, सर्व राजकीय पक्षांना अधिवेशनादरम्यान चर्चेत योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार समान नागरी कायद्याबाबत विधेयक मांडू शकते. यूसीसीबाबत पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर त्याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे. 27 जून रोजी भोपाळमध्ये पीएम मोदी यांनी समान नागरी कायद्याबाबत सूचक विधान केले होते.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. यूसीसीवर पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला आहे.

पावसाळी अधिवेशनासंदर्भात काँग्रेस संसदीय समितीची (CPC) बैठक शनिवारी (1 जुलै) सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. 10 जनपथ येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे.

तसेच, दिल्लीतील ट्रान्सफर पोस्टिंगच्या प्रकरणावर उपराज्यपालांना अधिकार देणाऱ्या विधेयकाबाबत मोदी सरकारला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशभर फिरत आहेत आणि विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत.

समान नागरी कायद्याबाबत खासदारांचे मत जाणून घेण्यासाठी 3 जुलै रोजी संसदीय स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या विषयावर विधी आयोग, विधी विभाग आणि विधी विभागाच्या प्रतिनिधींना बोलावले आहे. या तिन्ही विभागांच्या प्रतिनिधींना विधी आयोगाने यूसीसीवर सर्वसामान्यांकडून सूचना मागवण्यासाठी पाचारण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT