ludhiana court  

 

Dainik Gomantak 

देश

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटामागे पाक-समर्थित खलिस्तान दहशतवादी!

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) ISI द्वारे समर्थित खलिस्तान-समर्थित गटाचा हात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) ISI द्वारे समर्थित खलिस्तान-समर्थित गटाचा हात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'लाल किल्ल्यातील घटनेनंतर गुप्तचर यंत्रणा पंजाबमध्ये (punjab) खलिस्तानी दहशतवाद्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून होती. पाकिस्तानातील सोशल मिडिया (social media) हँडलर पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या सूचना देत होते. राज्य पोलिसांसोबतच्या संयुक्त कारवाईत त्यांचे असे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत.'

"आम्हाला पाकिस्तानच्या ISI द्वारे समर्थित असलेल्या खलिस्तान समर्थित गटाला पुन्हा एकदा नव्याने पुनरुज्जीवित करण्यात येत आहे. दरम्यान यासंबंधीचे इनपुट स्थानिक पोलिसांना आम्ही दिले आहेत. तसेच फरार झालेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यासाठी राज्यभर ऑपरेशन चालवले जात असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

नोव्हेंबरमध्ये पठाणकोटमधील (pathankot) लष्करी छावणीच्या गेटजवळ ग्रेनेड स्फोटाची झालेली घटना देखील स्थानिक गुन्हेगारांनी राबवलेली दहशतवादी कृती होती, असेही त्यांनी नमूद केले.

"यावर्षी पंजाबजवळ मानवरहित हवाई वाहनांच्या सुमारे 42 ड्रोन दृश्यांची नोंद झाली आहे. पाकिस्तानच्या बाजूने ड्रोनचा वापर करुन स्फोटके डागण्यात आली होती. दरम्यान राज्यातील शांतता अस्थिर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले.

गेल्या पाच महिन्यांत पंजाब पोलिसांनी सीमावर्ती शहरांमधून सात बॉम्ब आणि 10 हून अधिक हॅंडबॉम्ब जप्त केले आहेत. या वर्षी ऑगस्टमध्ये पंजाब पोलिसांनी जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांच्या पुतण्याचा मुलगा गुरुमुख सिंग याला अटक केली होती. दरम्यान त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त केली होती. त्याला पाकिस्तानच्या ISI आणि इतर पाकिस्तान-आधारित खलिस्तान समर्थक दहशतवादी गटांकडून पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी लॉजिस्टिक सपोर्ट मिळत होता, ज्यामध्ये राज्य निवडणुकांपूर्वी दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Case: दिनेश गावडेंच्‍या शवचिकित्सा पोस्टमॉर्टमवरून उफाळला वाद; प्रकरण तापले : वन खाते-फॉरेन्सिक विभाग आमनेसामने

Goa Accident: स्कूटरवरील नियंत्रण सुटले अन् होत्याचे नव्हते झाले! बांबोळीत मुंबईच्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Tim David Video: मुंबईला हरवलं पण शिस्त विसरला! टीम डेव्हिडचा 'तो' अश्लील इशारा कॅमेऱ्यात कैद; 'BCCI'ने ठोठावला दंड

Horoscope: मंगळवार ठरेल टर्निंग पॉईंट! वैधृति योगाचा चमत्कार; 5 राशींच्या नशिबात मोठा धनयोग

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

SCROLL FOR NEXT