Yashwant Sinha Dainik Gomantak
देश

Presidential Election: यशवंत सिन्हा यांनी नामांकन केले दाखल, राहुल गांधीही उपस्थित

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या वतीने यशवंत सिन्हा यांनी नामांकन अर्ज आज दाखल केला आहे.

दैनिक गोमन्तक

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ''आम्हाला 17 हून अधिक पक्षांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर ज्या लोकांशी आम्ही संपर्क साधला नाही, त्यांनी स्वत: आमचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा जी यांना फोन करुन पाठिंबा दर्शवला आहे. आता कदाचित सर्व पक्ष एकत्र आल्यानंतर निकराची लढत होईल.''

यापूर्वी, रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते की, ''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांना शक्य ते सर्व प्रयत्न करावे लागतील.'

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे अंकगणित पाहता परिस्थिती म्हणावी तशी कठीण नाही. भाजपच्या उमेदवाराला पराजित करण्यासाठी विरोधी पक्षांना ठोस प्रयत्न करावे लागतील. वायएसआर काँग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्ष (BSP) सारख्या काही विरोधी पक्षांनी 18 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आधीच पाठिंबा दिला आहे, अशा वेळी शरद पवारांचे हे वक्तव्य आले आहे.

दुसरीकडे, झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ओडिशातील संथाल समुदायातील आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकते. JMM हा विरोधी गटाचा एक भाग आहे, ज्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून सिन्हा यांची निवड केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT