Bihar News Dainik Gomantak
देश

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

Bihar News: बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया गावातून थरारक घटना समोर आली आहे. अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्याने किंग कोब्रासारख्या विषारी सापाचा चावा घेतला, आणि या चाव्यामुळे सापाचा जागीच मृत्यू झाला.

Sameer Amunekar

बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया गावातून एक अजब आणि थरारक घटना समोर आली आहे. अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्याने किंग कोब्रासारख्या विषारी सापाचा चावा घेतला, आणि या चाव्यामुळे सापाचा जागीच मृत्यू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे बाळाला काहीही इजा झाली नाही, तो सध्या पूर्णपणे सुरक्षित आहे.

ही घटना गावात चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा नावाचा हा चिमुकला आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक एक किंग कोब्रा त्याच्याजवळ सरपटत आला. चिमुकल्याने सहजपणे त्या सापाला हातानं उचलले आणि खेळणं म्हणून चावा घेतला. या चाव्यामुळे सापाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर, गोविंदा काही वेळातच बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) नेण्यात आले. तिथून पुढे बेतिया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) त्याला दाखल करण्यात आले. सध्या गोविंदा स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहे.

गोविंदाची आजी मातेश्वरी देवी यांनी सांगितले की, “गोविंदाची आई लाकूड गोळा करत होती, तेव्हा अचानक साप बाहेर आला. बाळाने सापाला मारलं आणि चावलंसुद्धा. तो एक गेहुआन म्हणजेच कोब्रा होता. आमचं बाळ फक्त एक वर्षाचं आहे.”

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून अनेक जण गोविंदाच्या शौर्याबद्दल अचंबित झाले आहेत. काही जण याला दैवी चमत्कार मानत आहेत, तर काहींनी यामध्ये अपघाती पण आश्चर्यजनक योगायोग असल्याचं म्हटलं आहे.

सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची नोंद घेतली असून वनविभागालाही याची माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT