Omicron variant

 

Dainik Gomantak

देश

केंद्र सरकारने 'या' 14 राज्यांना केलं सतर्क, 2022 मध्ये पुन्हा लॉकडाऊन?

पुन्हा लॉकडाऊन? केंद्र सरकारने राज्यांना ओमिक्रॉनसाठी वॉर रूम तयार करण्याचे निर्देश दिले आहेत

दैनिक गोमन्तक

देशात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवडाभरात रुग्ण अनेक पटींनी वाढत आहेत. आता 14 राज्ये ओमिक्रॉनच्या विळख्यात आहेत आणि देशभरात 221 जणांना याची लागण झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 65 लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. याशिवाय दिल्लीत 54 रुग्णांची माहिती समोर आली आहे.

असे असूनही, लोक ओमिक्रॉनबद्दल गंभीर नाहीत. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यात अनेक निर्बंध आहेत.

तीन पट जास्त संसर्गजन्य

केंद्र सरकारने (Central Government) म्हटले आहे की कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन (omicron-variant) प्रकार डेल्टा पेक्षा तिप्पट संसर्गजन्य आहे, त्यामुळे राज्यांनी त्वरीत निर्णय घ्यावेत आणि रात्रीचा कर्फ्यू आणि कंटेनमेंट झोन तयार करणे यासारख्या आवश्यक उपाययोजनांसाठी सतर्क राहावे. गेल्या 18 दिवसांत ही संख्या वाढली आहे. मात्र, एकाही रुग्णाला आयसीयूमध्ये जावे लागले नाही, ही दिलासादायक बाब आहे.

राज्य जिल्हास्तरावर वॉर रूम तयार करणार

केंद्र सरकारने राज्यांना ओमिक्रॉनसाठी वॉर रूम तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे की, ओमिक्रॉन विषाणू वेगाने पसरत आहे. जिल्हा किंवा स्थानिक स्तरावर नाईट कर्फ्यू किंवा कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी त्वरित पावले उचलली जावीत.

ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेसबद्दल केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे की, डेल्टा व्यतिरिक्त ओमिक्रॉन देशाच्या विविध भागात पोहोचला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोरपणे पुढे यावे लागेल. कठोर पावले उचलावी लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT