Incidents of violence Dainik Gomantak
देश

नुपूर शर्मा वादग्रस्त वक्तव्य: देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना

रांची शहरातील इंटरनेट सेवा बंद

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपुर्वी भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामूळे भारतासह जगातील अनेक नेत्यांनी या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. याचबरोबर नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्त देशभरात गेले दोन दिवस जोरदार निदर्शने सुरू आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, बंगालमधील अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे. तसेच आज देशातील अनेक शहरात हिंसाचाऱाच्या घटना घडल्या आहेत. (Nupur Sharma controversial statement; Violence in many parts of the country )

काल रांचीमध्ये नमाजानंतर उसळलेल्या हिंसाचारात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण शहरात शांतता पसरली होती. शहरातील संवेदनशील भागांचे सुरक्षा दलांनी छावणीत रूपांतर केले आहे. दरम्यान, रांचीमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही बदमाश मेन रोडच्या महावीर मंदिरावर दगडफेक करताना दिसत आहेत. मंदिराजवळ एक तरुण इस्लाम जिंदाबादचा नारा देत आहे. त्याचवेळी तेथे गोळी झाडली जाते, जी थेट तरुणाच्या डोक्यात जाते. तो जागीच पडतो. यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला, जो आता समोर आला आहे.

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्याच्या साथीदारांनी आरडाओरडा सुरू केला, काही जण त्याच्या जवळही आले. लोकांनी त्याला रिम्स रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी सकाळपासून मृतदेह घराबाहेर ठेवून निदर्शने केली. ते नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. त्यांचे मन वळवण्यासाठी प्रशासनाचे पथक पोहोचले. यानंतर एकाला त्याच्या ताब्यात देण्यात आले.

हिंदू संघटनांनी शनिवारी रांचीमध्ये बंदची हाक दिली आहे. यानंतर प्रशासन हाय अलर्टवर आहे. शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवान तैनात करण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात शांतता असून गणातील खासगी वाहनेच धावत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT