Bike Trip in Goa Dainik Gomantak
देश

Bike Trip in Goa: बीच बस झाले...आता करा रोड सफारी

गोवा (Bike Trip in Goa) हे भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, आणि गोव्याच्या आजूबाजूला बरीच मोठी पर्यटन ठिकाणे आहेत जी लोकांना आकर्षित करतात.

दैनिक गोमन्तक

गोवा हे भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, आणि गोव्याच्या आजूबाजूला बरीच मोठी पर्यटन ठिकाणे आहेत जी लोकांना आकर्षित करतात. तुम्ही गोव्याच्या आजूबाजूच्या या ठिकाणांचा रोड ट्रिपमधून (Bike Trip in Goa) आनंद घेऊ शकता. आता तुम्ही असा विचार करत असाल की गोव्याभोवती कोणती ठिकाणे आहेत जिथे आपण कारने किंवा बाइकने जाऊ शकता. (Now plan a bike trip to Goa: Head to these top five places)

Goa To Amboli

गोवा ते अंबोली Goa To Amboli

विकेंड चा आनंद घेण्यासाठी तुम्ही तुमच्या गाडीने अंबोलीला जावू शकता. आंबोली सुंदर सनसेट पॉइंट, नेत्रदीपक धबधबे आणि प्राचीन मंदिरांसाठी प्रसिध्द आहे. येथे आपण आपल्या पार्टनरसह, कुटुंबासह, मित्रांसह किंवा स्वत: एकटेही बाईक राइड करू शकता. विकेंड एंजॉय करण्यासाठी हे एक परफेक्ट डेस्टीनेशन आहे. सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये वसलेले हे गंतव्य विपुल विदेशी वनस्पती आणि जीवजंतूंसाठी देखील प्रसिद्ध आहे. गोव्यापासून सुमारे 92 कि.मी. अंतरावर असलेल्या या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला 2 तास 30 मिनिटे एवढा वेल लागू शकतो.

Dandeli To Goa

गोवा ते दांडेली- Dandeli To Goa

हे निसर्ग प्रेमींसाठी एक नंदनवन आहे, आणि गोव्यापासून काही अंतरावर असलेले हे सर्वात आवडते ठिकाण देखील आहे. निसर्ग आपल्याला भरबरून देत असतो त्याचंच हे एक उदाहरण आहे. बर्डवॅचिंगसाठी डंडेली प्रसिद्ध आहे. ही एक अशी जागा आहे जिथे आपण नौकाविहार, रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग आणि इतर गोष्टींचा आनंद घेवू शकता. येथे आल्यानंतर, आपण दांडेली वन्यजीव अभयारण्य आणि कवला लेण्यााना देखील भेट देवू शकता.गोव्यापासून सुमारे 132 कि.मी. अंतरावर, या ठिकाणी पोहोचण्यास तुम्हाला सुमारे 3 तास लागतात.

Goa To Panchgani

गोवा ते पाचगणी - Goa To Panchgani

पाचगणी हे महाराष्ट्र राज्यातील एक हिल स्टेशन आहे आणि आजूबाजूला असलेल्या पाच डोंगरांमुळे या ठिकाणाचे नाव पाचगणी असे पडले आहे. पाचगणी महाबळेश्वर जवळ आहे. गोव्याहून रोड ट्रिप करतांना तुम्ही एकाच वेळी दोन ठिकाणी जाऊ शकता ही जास्त सोयीस्कर बाब आहे. या ठिकाणी प्रसिद्ध असलेले टेबल लँड पॉइंट, ज्वालामुखीचा पठार आहे, तसेच प्रसिद्ध कमलगड किल्ला आहे, जो 19व्या शतकात ब्रिटिशांनी तुरुंग म्हणून वापरला होता. येथे आपल्याला बरीच ठिकाणे पाहायला मिळतील. हे ठिकाण गोव्यापासून सुमारे 377 कि.मी. अंतरावर, असून या ठिकाणी पोहोचण्यास तुम्हाला साधारण 7 तास लागतील.

Agumbe To Goa

गोवा ते अगुम्बे - Agumbe To Goa

आपण ऑफबीट ठिकाण शोधत असाल तर अगुम्बे आपल्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे. कर्नाटकच्या मालनाड भागात वसलेले हे विस्तीर्ण गाव केवळ औषधी वनस्पती आणि कॉटेज उद्योगाशीच संबंधित नाही तर पावसाचे संरक्षण करण्यासाठी देखील प्रसिद्द आहे. आपण या ठिकाणी बरीच सुंदर दृश्ये पाहू शकता. तसेच, ओनाके अब्बी फॉल्स, बरकाना फॉल्स, कुडलु थीर्था फॉल्स इत्यादी ठिकाणांना भेट देवू शकता. गोव्यापासून हे ठिकाण 383 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला ७ तास लागू शकतात.

Goa To Mahabaleshwar

गोवा ते महाबळेश्वर - Goa To Mahabaleshwar

आमचा विश्वास आहे की गोव्याला भेट दिल्यानंतर तुमची पुढची रोड ट्रिप महाबळेश्वर हिल स्टेशन असावी. समुद्रसपाटीपासून सुमारे 1372 कि.मी. उंचीवर वसलेले महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन आहे, जिथे बरीच आश्चर्यकारक ठिकाणे आहेत. या हिल स्टेशनच्या भागात विदेशी वनस्पती आणि पक्षी, भव्य शिखरे, प्राचीन तलाव आणि सुंदर दऱ् डोंगरं आहेत. आपण आपल्याबरोबर महाबळेश्वर हिल स्टेशनशी संबंधित अगणीत आणि सुंदर आठवणी घेऊन जाल. गोव्यापासून 391 कि.मी. अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला सुमारे 8 तासांचा कालावधी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT