Now even a private doctor may suggest a Covid-19 test
Now even a private doctor may suggest a Covid-19 test 
देश

आता खाजगी डॉक्टर देखील कोविड -19 चाचणी सुचवू शकतो

pib

नवी दिल्ली, 

देशात कोविड -19  चाचण्या घेण्यात आलेल्या एकूण लोकांची संख्या लवकरच एक कोटींचा टप्पा गाठेल.

केंद्र सरकारकडून सर्व अडथळे दूर करण्यात आल्यामुळे हे शक्य झाले आहे. केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोविड -19.साठी चाचण्या वाढवण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

जलद गतीने विस्तारत असलेल्या निदान चाचणी नेटवर्कद्वारे आतापर्यंत  90,56,173 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात आता सार्वजनिक क्षेत्रात  768 आणि  297 खाजगी अशा एकूण 1065 प्रयोगशाळा आहेत.रोजची चाचणी क्षमता देखील वेगाने वाढत आहे. काल, कोविड -19 साठी तब्बल 2,29,588 जणांची चाचणी झाली.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण उपायाद्वारे कोविड-19 चाचणी केवळ सरकारी डॉक्टरांच्या  नाही तर आता कोणत्याही नोंदणीकृत प्रॅक्टिशनरच्या शिफारशीनुसार  करता येईल, आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाचणीचे निकष पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोविड  चाचणीची शिफारस लिहून देण्यासंबंधी खासगी डॉक्टरांसह  सर्व पात्र वैद्यकीय डॉक्टरांना सक्षम करून लवकरात लवकर चाचणी पार पाडण्यासाठी सुलभ करण्यासाठी त्वरित पावले उचलावी, असा सल्ला केंद्राने राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.

प्रादुर्भावाचा लवकर शोध घेण्यासाठी आणि त्याला आळा घालण्यासाठी 'चाचणी-शोध-उपचार' ही महत्त्वाची रणनीती असल्याचा पुनरुच्चार करत केंद्र सरकारने राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना राज्यातील सर्व कोविड -19  चाचणी प्रयोगशाळांचा  पूर्ण क्षमतेने वापर सुनिश्चित करण्यासाठी शक्य ती सर्व  पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे सर्व प्रयोगशाळांच्या विशेषत: खाजगी प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेचा उपयोग सुनिश्चित होईल आणि  लोकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

या व्यापक मोहिमेच्या माध्यमातून आयसीएमआरने जोरदारपणे अशी शिफारस केली आहे की प्रयोगशाळांना आयसीएमआरच्या  मार्गदर्शक सूचनांनुसार कोणत्याही व्यक्तीची चाचणी करता यायला हवी आणि राज्य प्रशासनाने कोणत्याही व्यक्तीला चाचणी करून घेण्यास प्रतिबंधित करू नये, कारण लवकर चाचणी केल्यास विषाणू रोखण्यास आणि जीव वाचविण्यात मदत मिळेल.

कोविड-19 च्या निदानासाठी आरटी-पीसीआर व्यतिरिक्त रॅपिड अँटीजेन पॉईंट-ऑफ-केअर चाचण्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जाव्यात असे आवाहन केंद्र सरकारने राज्यांना केले आहे. रॅपिड अँटीजेन चाचणी जलद, सोपी, सुरक्षित आहे आणि आयसीएमआरने चाचणीसाठी नमूद केलेल्या निकषानुसार प्रतिबंधित क्षेत्र  तसेच रुग्णालयात देखील वापरली जाऊ शकते. आयसीएमआर अशा किटचे प्रमाणीकरण करत आहे जेणेकरून नागरिकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.

केंद्राने राज्यांना / केंद्र शासित प्रदेशांना चाचणी शिबिरे आयोजित करून तसेच मोबाईल व्हॅनचा वापर करून 'मोहीम मोड' अवलंब करून मोठ्या प्रमाणात  चाचणी करायला सांगितले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT