Nitish Kumar Dainik Gomantak
देश

Nitish Kumar Resign: नितीश कुमार यांनी दिला बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; 'हे' आहे कारण

Nitish Kumar Resign: त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला अशा आशयाचे वक्तव्य नितीश कुमार यांनी केले आहे.

दैनिक गोमन्तक

Nitish Kumar Resign: नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन संसदेतून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला आहे. आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला आमचे काम करु दिले जात नव्हते. नवीन युतीसोबत काम करण अशक्य होते. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला अशा आशयाचे वक्तव्य नितीश कुमार यांनी केले आहे. आपण आपल्या पक्षातील सर्वांच्या परवानगी आणि सहमतीनेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आरजेडी ( RJD ) आणि जेडीयू ( JDU ) यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद होते. जातनिहाय जणगणना, आरक्षण, सरकारी नोकऱ्यांमधील भरती अशा अनेक मोठ्या आणि महत्वाच्या कामाचे श्रेय आरजेडी घेण्याचा प्रयत्न करत असे. अशावेळी लोकहिताची कामे करतानादेखील अडथळा निर्माण झाला आहे. असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. भाजप सरकारने त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा एनडीए सोबत युती करणार असल्याची चिन्हे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, याआधी नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती समाप्त करत आरजेडीबरोबर युती केली होती. आता पुन्हा ते आरजेडीबरोबरच्या युतीमधून देखील बाहेर पडले आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना पाहायला मिळत आहे. लालू प्रसाद यादव यांच्या मुलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर कचरा परत कचरापेटीत गेला अशा आशयाचे ट्वीट केले आहे. असे म्हटले जात आहे की, आगामी लोकसभा निवडणूकांच्या धर्तीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकार संपुष्टात आल्यानंतर बिहारचे राजकारण कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT