Mobile In The Train Dainik Gomantak
देश

ट्रेनमध्ये मोबाइलवर मोठ्याने बोलणाऱ्यांवर होणार कारवाई; जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम

तुम्हालाही ट्रेनमध्ये मोबाइलवर मोठ्याने बोलण्याची आणि गाणी ऐकण्याची सवय असेल तर सावधान

दैनिक गोमन्तक

ट्रेनमध्ये प्रवास करत असतांना अनेक व्यक्ती मोठ्याने फोनवर बोलत असल्याचा किंवा स्पीकरवर गाणी लावून ऐकत असतांनाचे आपन अनेकदा पाहिले आहे. परंतू आपण त्यांना काहीही म्हणत नाहीत. परंतू आता अशा बेशिस्त प्रवाशांवर कारवाई होऊ शकते. कारण प्रवाशांच्या सुखदायी प्रवासासाठी रेल्वेने या बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवास्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे (Ministry of Railways)अनेक लोक फोनवर मोठ्याने बोलतात, हेडफोनशिवाय गाणी ऐकत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात आता रेल्वेने नवीन नियमावली प्रसिद्ध केली असून नवीन रेल्वे विभागाने नविन नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी आता थेट रेल्वे कर्मचाऱ्यांनाच जबाबदार धरणार आहे.

रेल्वेने (Train)नव्या आदेशात तिकीट तपासनीस, आरपीएफ, कॅटरिंग आणि कोच अटेंडंटसह ऑन-बोर्ड ट्रेन कर्मचार्‍यांना डब्यांमध्ये प्रवेश करण्याचे आणि प्रवाशांना सार्वजनिक शिष्टाचार पाळण्याचे आदेश दिले आहेत. “या कामात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना प्रवाशांसोबत विनम्रपणे वागण्याची सूचना करण्यात आली असून तक्रारीला कोणतीही जागा ठेवू नये असं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

अशी असणार भारतीय रेल्वेची नवी नियमावली

- प्रवासी आपल्या फोनवर जोरात बोलणार किंवा स्पीकरवर मोठ्याने गाणी ऐकणार नाही.

- तिकीट तपासनीस(TC), रेल्वे कर्मचारी प्रवाशांना त्यांच्या फोनवर मोठ्याने न बोलण्याबद्दल सल्ला देतील.

- रात्री १० नंतर ट्रेनमधील रात्रीची लाईट सोडून इतर सर्व लाईट बंद करावे लागतील.

- एकत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्याची परवानगी नाकारणार.

- तरीही असे प्रवाशी आढळून आल्यास अशा प्रवाशांवर कारवाई केली जाईल.

- ६० वर्षांवरील, दिव्यांग, एकट्या महिला प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सर्व आवश्यक ती मदत केली जाणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT