NEET UG 2024 Dainik Gomantak
देश

NEET UG 2024: मोठी बातमी! 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा, रद्द होणार सर्वांचे स्कोअरकार्ड

NEET UG रिझल्ट 2024 प्रकरणी दाखल केलेल्या 3 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज (13 जून) सुनावणी झाली.

Manish Jadhav

Supreme Court on NEET UG Result: NEET UG रिझल्ट 2024 प्रकरणी दाखल केलेल्या 3 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज (13 जून) सुनावणी झाली. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, 1563 विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. या 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल, असेही केंद्राने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, परीक्षा पुन्हा 23 जून रोजी घेतली जाईल आणि रिझल्ट 30 जूनपूर्वी जाहीर केला जाईल. त्यामुळे 6 जुलैपासून सुरु होणाऱ्या कॉउंसलिंगवर कोणताही परिणाम होणार नाही. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

सरकारने असा युक्तिवाद केला

दरम्यान, 10, 11 आणि 12 तारखेला समितीच्या बैठका झाल्याचे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले. समितीने 1563 विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ग्रेस मार्क्स रद्द करण्याची शिफारस केली. फक्त बाधित विद्यार्थ्यांचीच पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाईल. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले की, एनटीएने तुमचा मुद्दा मान्य केला आहे. ते देण्यात आलेले ग्रेस मार्क्स काढून टाकत आहेत. NTA ने सांगितले की, 1563 विद्यार्थ्यांसाठी परीक्षा 23 जून रोजी होईल आणि रिझल्ट 30 जूनपूर्वी येईल. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्किंग मिळाले तेच विद्यार्थी परीक्षेला बसतील.

यानंतर न्यायमूर्ती मेहता यांनी एनटीएला सांगितले की, तुम्ही 1563 विद्यार्थ्यांचा रिझल्ट रद्द करु शकत नाही. तुम्हाला पुन्हा परीक्षा घ्यावी लागेल. यानंतर न्यायमूर्ती नाथ यांनी एनटीएला विचारले की, तुम्ही कॉउंसलिंग कधी सुरु करणार आहात?

या विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्डे रद्द केले जाईल

NTA ने पुन्हा सांगितले की, समितीचे मत आहे की 1563 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा उपस्थित राहावे लागेल. 1563 विद्यार्थ्यांना जारी करण्यात आलेले स्कोअरकार्डे रद्द केले जातील. पुन्हा परीक्षा घेतली जाईल. जे या फेरपरीक्षेला बसणार नाहीत त्यांना ग्रेस मार्क्सशिवाय परीक्षेला बसावे लागेल. तथापि, 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या एनटीएच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालय आणि याचिकाकर्त्याने असहमती दर्शवली. हे सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निर्णयांच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले.

त्यानंतर न्यायालयाने एनटीएला विचारले की, अशी किती केंद्रे आहेत जिथे ही समस्या उद्भवली? यावर NTN ने उत्तर दिले की, 6 केंद्रे आहेत जिथे ही समस्या उद्भवली आहे. न्यायालयाने पुढे सांगितले की, ही परीक्षा 5 मे रोजी झाली होती आणि आज 13 जून आहे. त्यावर अद्याप कोणीही आक्षेप घेतलेला नाही.

न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला

न्यायालयाने पुढे सांगितले की, फेरपरीक्षेची तारीख आजच ठरवली जाईल. 23 जून रोजी 1563 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होईल आणि याचा रिझल्ट 30 जूनपूर्वी जाहीर केला जाईल. त्याचवेळी, कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने नोटीस बजावून 2 आठवड्यांत उत्तर मागवले आहे. ज्यावर 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

एनटीएने सांगितले की, तिसऱ्या याचिकेतील पेपर लीकचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर नाही. त्यामुळे न्यायालयाने एनटीएचे म्हणणे रेकॉर्डवर घेतले. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, न्यायालयाने जरिपती कार्तिकची याचिका निकाली काढली आहे. 23 जून रोजी 1563 विद्यार्थी पुन्हा परीक्षा देतील आणि त्यांचा निकाल 30 जूनपूर्वी जाहीर केला जाईल. तर, NEET कॉउंसलिंग 6 जुलै रोजी होईल. अलख पांडे यांच्या प्रकरणात न्यायालयाने नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले. ज्याची सुनावणी 8 जुलै रोजी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT