Student Dainik Gomantak
देश

धक्कादायक! NEET परीक्षेदरम्यान विद्यार्थिनींना अंर्तवस्त्र काढण्यास पाडले भाग

NEET 2022: केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Kerala: केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेला (NEET 2022) बसलेल्या एका विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी तिला अंर्तवस्त्र काढण्यास भाग पाडण्यात आले. याप्रकरणी किमान 100 मुलींनी तक्रारी केल्या आहेत. दुसरीकडे, असेही सांगण्यात येत आहे की, सुरक्षा तपासणीदरम्यान ब्रा च्या मेटल हुकमुळे मेटल डिटेक्शन मशीनमध्ये बीप झाला. त्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी मुलीला ब्रा काढण्यास भाग पाडले.

दरम्यान, मुलीच्या वडिलांनी पोलिस (Police) स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण कोल्लम जिल्ह्यातील NEET केंद्राशी संबंधित आहे. ‘मेटलिक हुक’ असल्याने महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुलीला ब्रा काढण्यास सांगितले. यानंतर पीडित मुलीने (Girls) अंर्तवस्त्र काढून आईला दिले जेणेकरुन तिला परीक्षेला बसता येईल.

दुसरीकडे, चदमंगलमचे केंद्र असलेल्या मार्थोमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने आपली जबाबदारी झिडकारुन लावली आहे. कोल्लम पोलिस प्रमुखांनी मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्याची पुष्टी केली आहे.

शिवाय, पोलिस उपअधीक्षक कोत्तारक्का यांच्याकडे ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 100 मुलींना या धक्कादायक घटनेला सामोरे जावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसर्‍या मुलीला तिची जीन्स काढण्यास सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT