नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे Dainik Gomantak
देश

नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या खात्याचे नाव जाहीर

नारायण राणे यांच नावाची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे समजल्यापासुन त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी दिली जाते यावर चर्चा सुरु होत्या.

दैनिक गोमन्तक

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज विस्तार होत असुन, यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या 4 नेत्यांना स्थान मिळणार आहे. यामध्ये नारायण राणे, कपील पाटील, भारती पवार, भागवत कराड या नेत्यांचा समावेश असणार आहे. तर आजच्या या मंत्री मंडळ विस्तारात एकुण 43 मंत्री शपथ घेणार आहेत. मात्र यावेळी चर्चा सुरू आहे ती नारायण राणे यांच्या नावाची. नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते आहे. तर रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. (Narayan Rane has the responsibility of the Union Ministry of Micro, Small and Medium Enterprises)

साधारणत: दिड वर्षांपुर्वी कॉंग्रेसमधुन भारतीय जनता पक्षात गेलेले नारायण राणे हे महाराष्ट्रातील त्या राजकीय नेत्यांपैकी एक आहेत, जे सत्ता असताना आणि नसतानाही नेहमीच चर्चेत असतात. मुळ मुंबईतील घाटला गावातील रहिवासी असलेल्या नारायण राणेंचा प्रवास शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासुन सुरु झाला होता. मातोश्री आणि बाळासाहेब ठाकरेंशी असलेली जवळीक या जोरावर त्यांच्या राजकीय प्रवासाने वेग घेतला. त्यानंतर नगरसेवक, बेस्ट महामंडळाचा अध्यक्ष, आमदार आणि मग मुख्यमंत्री पदापर्यंत आल्यानंतर राणेंनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.आणि त्यानंतर आता भारतीय जनता पक्षात जात त्यांनी आज केंद्रीय मंत्रीपद मिळवल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT