Kalyan Singh Dainik Gomantak
देश

योगी सरकारचा मोठा निर्णय; 5 रस्त्यांना देणार 'कल्याण सिंह' यांचे नाव

Uttar Pradesh: उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात आदर्श आणि मूल्यांचे राजकारण करणाऱ्या उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल कल्याण सिंह (Kalyan Singh) यांच्या जाण्याने शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी त्यांचे निधन झाल्यापासून लोकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने पाच जिल्ह्यांतील रस्त्यांना दिवंगत कल्याण सिंह यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, अयोध्या, लखनऊ, अलीगढ, एटा, बुलंदशहर आणि प्रयागराजमधील प्रत्येकी एका महत्त्वाच्या रस्त्याला कल्याण सिंह मार्ग असे नाव दिले जाणार आहे. यासोबतच अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव देखील कल्याण सिंह मार्ग करण्यात येणार आहे.

राम मंदिर चळवळीतील नेते दिवंगत कल्याण सिंह यांचे बलिदान सर्वज्ञात आहे. त्यांनी राम मंदिरासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्चीही सोडली होती. राम मंदिर चळवळीतील त्यांचे योगदान पाहता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT