Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

उत्तर प्रदेशात १ लाख भोंगे उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद

उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले; वादाचे प्रसंग ही नाहीत

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यावरून राजकीय राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज्यशासनाला आव्हान देत भोंगे उतरवण्यासाठी राज्यशासनाला सुनावले होते. ज्या मशिदीवरील भोंगे हटणार नाहीत, त्या मशिदीसमोर भोंग्यावरून हनुमान चालीसा पठण करावी, असे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

याच वेळी उत्तर प्रदेशात शांततेत अजानसाठीचे भोंगे उतरवण्यात येत आहेत. हे भोंगे उतरवत असताना उत्तर प्रदेशात कोणत्याही प्रकारचे वादंग उठलेले नाहीत. यामुळे प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य केलं आहे. याबाबात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत स्पष्ट केले कि, उत्तर प्रदेशात सुमारे १ लाख भोंगे उतरवण्यात आले आहेत.

तसेच ते म्हणाले कि, आमच्या सरकारनं भोंग्याचं प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळलं आहे. उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरून आतापर्यंत सुमारे १ लाख भोंगे हटवले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भोंगे हटवल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात कर्कश कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भोंगे हटवताना कुठेही वाद झाला नाही. यूपी पोलीस सातत्यानं भोंग्यांविरोधात मोहीम राबवत आहेत.”

त्यांनी पुढे म्हटलं की, “आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील नमाज पठण करण्याचा प्रश्नही सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करू नये, असे सक्त आदेश आम्ही दिले होते. आता रस्त्यावर कुणीही नमाज अदा करत नाही. यूपीमध्ये मुस्लिमांची संख्या २५ कोटींच्या आसपास आहे. लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांत किंवा मशिदीत नमाज अदा करून नवीन आदेशाचं पालन करत आहेत.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

Porvorim Shooting Case: पर्वरी गोळीबारप्रकरणी आठवा संशयित मुंबईत जेरबंद; चुनाभट्टीत सापळा रचून गुन्हे शाखेची कारवाई

Pakistan Airstrike Afghanistan: गाढ झोपेत असताना काळाचा घाला! पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ला; लहान मुलांसह 22 ठार

Goa IDC E Auction: गोव्यात 50 भूखंडांचा ई-लिलाव; वेर्णा, लाटंबार्से अन् किटलातील भूखंडांसाठी 'आयडीसी'ची नोटीस जारी

SCROLL FOR NEXT