N Biren Singh News, Manipur CM Oath Ceremony News Dainik Gomantak
देश

एन बीरेन सिंह दुसऱ्यांदा बनले मणिपूरचे मुख्यमंत्री

एन बिरेन सिंग (N. Biren Singh) सोमवारी दुसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इंफाळमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल येऊन बराच अवधी झाला आहे. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केले. मात्र मुख्यमंत्री पदावरुन या राज्यांमध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. यातच आता भाजपने जिंकलेल्या मणिपूर (Manipur) राज्यात मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला आहे. (N. Biren Singh became the Chief Minister of Manipur for the second time)

याच पाश्वभूमीवर एन बिरेन सिंग (N. Biren Singh) सोमवारी दुसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. इंफाळमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एन बिरेन सिंग यांची एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. सिंह यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानंतर केंद्रीय निरीक्षक अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सांगितले होते की, 'हा एक अतिशय चांगला निर्णय आहे, यामुळे मणिपूरमध्ये एक स्थिर आणि जबाबदार सरकार आहे याची खात्री होईल.' एन बिरेन सिंग यांची 32 आमदारांसह भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. (Manipur CM Oath Ceremony News)

दरम्यान, मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते. तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि किरेन रिजिजू यांनी पक्षाच्या वतीने राज्यपालांना एक पत्र सादर केले, ज्यात म्हटले आहे की, एन बिरेन सिंग यांची 32 आमदारांसह भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे

तसेच, राजभवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'जनता दल (United), दोन राजकीय पक्षांच्या सहा सदस्यांनी, कुकी पीपल्स अलायन्सचे दोन सदस्य आणि एक अपक्ष यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सादर करण्यात आली आहेत.' यासह, 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचे संख्याबळ 41 आणि दोन तृतीयांश बहुमत असणार आहे. आदल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की, 'एन बिरेन सिंग दुसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT