Accused Dainik Gomantak
देश

उदयपूर हत्याकांडातील दोषींना फाशी द्या, मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केली मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचानेही उदयपूरमध्ये एका टेलरच्या निर्घृण हत्येवर नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

Udaipur Murder Case: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचानेही उदयपूरमधील टेलरच्या निर्घृण हत्येवर नाराजी व्यक्त केली आहे. या टेलरची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केली आहे. कारण हे आरोपी 'दहशतवादी आणि सैताना' पेक्षा कमी नाहीत. सरकारने या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन या आरोपींना फाशी द्यावी, असेही मंचाने म्हटले आहे. (Muslim Rashtriya Manch Of RSS Demanded Death Penalty For Udaipur Killers)

किंबहुना, मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय संयोजक, सहसंयोजक, पदाधिकारी आणि सर्व सेलचे प्रभारी यांच्या ऑनलाईन बैठकीत या सर्वांनी या हत्येचा निषेध केला. शासनाकडे कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मंचाचे राष्ट्रीय निमंत्रक मुहम्मद अफजल आणि शाहिद अख्तर यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. देशातील सर्व जनतेला धर्म, जात, समुदाय याच्या वरती उठून द्वेषाला पराभूत करण्यासाठी काम करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, टेलर कन्हैयालालच्या निर्घृण हत्येनंतर चौफेर टीका होत आहे. हत्येच्या तपासात आतापर्यंत झालेल्या खुलाशांमध्ये पाकिस्तानचा (Pakistan) हात असल्याचे समोर आले आहे. ही घटना घडवणाऱ्या दोन आरोपींचे कराचीस्थित सुन्नी इस्लामिक संघटना दावत-ए-इस्लामीशी संबंध आहेत. मात्र, या प्रकरणी पाकिस्तानकडूनही एक वक्तव्य समोर आले असून, हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

शिवाय, दोन्ही आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण NIA कडे सोपवण्यात आले आहे. या घटनेनंतर उदयपूर येथून पळून गेलेल्या आरोपींना राजस्थान (Rajasthan) पोलिसांनी (Police) राजसमंद जिल्ह्यात पकडले. दोन्ही आरोपी अजमेर शरीफ दर्ग्याच्या दिशेने जात होते आणि तिथे आणखी एक व्हिडिओ शूट करणार होते. कन्हैयाच्या हत्येनंतर लगेचच त्यांवनी हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल करुन त्याची जबाबदारी स्वीकारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT