Muslim Girl Students Dainik Gomantak
देश

VIDEO: मुस्लिम विद्यार्थिनींनी बुरखा परिधान करुन केला 'रॅम्प वॉक'; जमियत-ए-उलेमाने दिला कारवाईचा इशारा

Muslim Girl Students: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी बुरखा परिधान करुन रॅम्प वॉक करताना दिसत आहेत.

Manish Jadhav

Muslim Girl Students: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी बुरखा परिधान करुन रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ यूपीच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात फॅशन शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. मुस्लिम विद्यार्थिनींचा बुरखा घालून रॅम्प वॉक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

फॅशन शो मध्ये विद्यार्थिनींनी बुरखा परिधान केल्याबद्दल जमियत-ए-उलेमाने नाराजी व्यक्त केली. तसेच कारवाईचा इशारा दिला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उलेमाने सांगितले की, फॅशन डिस्प्लेसाठी बुरखा हा आयटम म्हणून दाखवू नये. जमियत-ए-उलेमाच्या या आक्षेपानंतर विद्यार्थिनींनीही आपले मत मांडले. एका विद्यार्थिनीने सांगितले की, तिला हे दाखवायचे आहे की बुरखा देखील फॅशनेबल असू शकतो.

बुरखा हा केवळ घरात परिधान करण्याचे साधन असू शकत नाही. तिने पुढे सांगितले की, ज्या फॅशन शोमध्ये छोटे कपडे परिधान केले जातात त्यामध्ये भाग घेऊ शकत नसल्यामुळे, मुस्लिम समाजातील महिलांसाठी (Women) तिला काहीतरी करण्याची इच्छा होती.

विद्यार्थिनींच्या या उपक्रमाला शिक्षकांनी पाठिंबा दिला

विद्यार्थ्यांच्या (Students) या उपक्रमाला मुझफ्फरनगर येथील श्री राम महाविद्यालयाचे शिक्षक डॉ.मनोज यांनी पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले की, हिजाब किंवा बुरखा मुस्लिम महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवू शकतो आणि जागतिक स्तरावर या पोशाखाशी संबंधित फॅशनच्या संधी वाढत आहेत.

ते पुढे म्हणाले, त्या खूप मेहनती विद्यार्थिनी आहेत. त्यांच्यापैकी एकाने विचार केला की त्यांनी मुस्लिम महिलांसाठी काहीतरी क्रिएटिव्ह करावे आणि हिजाब देखील फॅशनेबल असू शकतो हे दाखवून द्यायचे होते.

तथापि, जमियत-ए-उलेमाचे जिल्हा संयोजक मौलाना मुकर्रम कासमी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटले की, ''बुरखा ही फॅशन प्रदर्शनाची वस्तू नाही आणि असे कृत्य एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करते. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

भविष्यात अशा घटना घडल्यास कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल. तुम्हाला फॅशन शो करायचा असाल तर करा पण कोणत्याही एका धर्माला टार्गेट करु नका.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT