Mulayam Singh Yadav Dainik Gomantak
देश

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावली, मेदांता रुग्णालयात दाखल

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे.

दैनिक गोमन्तक

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. 82 वर्षीय मुलायम सिंह यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (mulayam singh yadav health deteriorated admitted to medanta hospital of gurugram)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह (Mulayam Singh Yadav) नियमित तपासणीसाठी मेदांता रुग्णालयात गेले होते, तिथेच त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उद्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) मुलायम सिंह यांना भेटण्यासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात जाऊ शकतात.

मुलायम सिंह यांची प्रकृती यापूर्वीही खालावली होती

गेल्या वर्षी 1 जुलै रोजी देखील यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतरही त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलायम सिंह यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, तिथेच त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना दाखल करण्यात आले.

याआधी मुलायम सिंह यादव यांना लखनऊच्या (Lucknow) मेदांता रुग्णालयात लघवीच्या संसर्गामुळे दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना तेथून डिस्चार्ज देण्यात आला. सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यांनी रुग्णालयात जाऊन मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेतले होते. जुलैमध्येही मुलायमसिंह यादव यांना मेदांतामध्ये पुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना आतड्याचा त्रास होता, मात्र उपचारानंतर त्यांना आराम मिळाला. त्यानंतर लगचे त्यांना घरी पाठवण्यात आले होते. मुलायमसिंह यादव यांना अनेकदा आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT