Mulayam Singh Yadav Death News Dainik Gomantak
देश

Mulayam Singh Yadav Death News : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mulayam Singh Yadav Death News : समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंह यादव यांचे आज निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून चिंताजनक होती. गेल्या काही दिवसांपासून ते गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल होते. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांचे वडील आणि पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

(Mulayam Singh Yadav Death News)

55 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. 1967 मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि सात वेळा निवडून येऊन लोकसभेचे खासदार झाले. 1996 मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT