Woman Dainik Gomantak
देश

MP News: झाबुआमध्ये महिलेला विवस्त्र करुन मारहाण, आतापर्यंत सहा जणांना अटक

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

MP News: मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, झाबुआचे एसपी अरविंद तिवारी यांनी सांगितले की, 'या प्रकरणात आतापर्यंत मुकेश कटारासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित महिला मजरुह मेहेरबान या व्यक्तीची दुसरी पत्नी आहे. आठ महिन्यांपूर्वी ती मुकेशसोबत राहायला गेली होती. घटनेच्या एक दिवस आधी ती रुपारेल खिंडीजवळ मेहेरबानकडे परतली होती. त्यानंतर मुकेश दुसऱ्या दिवशी त्याच्या साथीदारांसह मेहेरबानच्या घरी पोहोचला. पीडितेला जबरदस्तीने घरातून नेत असताना तिचे कपडे फाटले. त्यानंतर साथीदारांसह त्याने पीडिता आणि तिच्या पतीला मारहाण केली.'

त्यांनी पुढे सांगितले की, 'पीडिता मजरुह मेहेरबानची दुसरी पत्नी होती. काही महिन्यांपूर्वी ती मुकेश कटाराकडे राहायला गेली होती. मात्र काही कारणास्तव मुकेश आपल्या साथीदारांसह महिलेच्या घरी पोहोचला. वाद सुरु असतानाच त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकरणी भादंवि कलम 147, 148, 149, 323, 294, 506, 364, 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी मुकेश कटारा, गोपाल, शंभू यांना अटक करण्यात आली होती. तर राजू, नरसिंग आणि नीलेश यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. अन्य दोन आरोपींची नावे समोर आली आहेत. शिवाय सहभागी व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.'

दुसरीकडे, ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश त्याच्या साथीदारांसह रुपारेलला पोहोचला. पीडितेबरोबर वाद सुरु असतानाच त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुकेशने आपल्या साथीदारांसोबत महिलेला विवस्त्र करुन मारहाण केली. पीडिता आणि तिच्या पतीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली. गावकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. पीडित महिला (Women) आणि आरोपी हे देखील आदिवासी समाजातील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Reservation Bill: काँग्रेसकडून महिला शक्तीचा 'विश्वासघात'! दामू नाईकांचा हल्लाबोल; महिला मोर्चातर्फे पणजीत ‘जन आक्रोश’ रॅली

खरी कुजबुज: काँग्रेस आमदार गेले कुठे?

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ हत्तीसाठी वनताराशी संपर्क! विश्वजीत राणे बंदोबस्तासाठी सरसावले; वन खाते ॲक्शन मोडमध्ये

Women Reservation Bill: भाजपचा 'महिला कार्ड' खेळण्याचा डाव? डॉ. अंजली निंबाळकरांचा हल्लाबोल! "आरक्षणाची एवढीच ओढ असेल, तर सीमांकनाची वाट का पाहताय?"

Panaji Lake Fish Death: न्यायालयाचा चाबूक! मळा तलावातील मासे मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल, महापालिकेची लपवाछपवी थांबवा; सांडपाण्याचे नकाशे द्या, कोर्टाचे निर्देश

SCROLL FOR NEXT