Corona virus

 

Dainik Gomantak

देश

देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या शंभरी पार, आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल (Lav Agarwal) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटले की, देशात ओमिक्रॉनची एकूण संख्या 100 च्या वर गेली आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या शंभरी पार केली आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (omicron variant) या नवीन व्हेरिएंटबाबत अपडेट दिले आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल (Lav Agarwal) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटले की, देशात ओमिक्रॉनची एकूण संख्या 100 च्या वर गेली आहे.

दरम्यान, ते म्हणाले, जगभरातील 91 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमिक्रॉनचा प्रसार डेल्टा व्हेरिएंटपेक्षा (Delta variant) वेगाने होत आहे.

महाराष्‍ट्र- 32

दिल्ली- 22

राजस्थान- 17

कर्नाटक- 8

तेलंगाना- 8

केरल- 5

गुजरात- 5

आंध्र प्रदेश- 1

तमिलनाडु- 1

चंडीगढ़- 1

पश्चिम बंगाल- 1

कोरोनाचे रुग्ण 10 हजारांहून कमी आले आहेत

त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या 20 दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे 10 हजारांहून कमी प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या एका आठवड्यात पॉझिटीव्हीटी रेट 0.65 टक्के होता. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 40.31 टक्के एकट्या केरळमध्ये आहेत.

19 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे

लव अग्रवाल पुढे म्हणाले की, देशात 19 जिल्हे आहेत जिथे संसर्ग खूप जास्त आहे. तेथे साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट 5-10 टक्क्यांच्या दरम्यान आहे. केरळमध्ये असे 9 जिल्हे, मिझोराममध्ये 5 जिल्हे, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक जिल्हे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT